मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makhana Salad: केवळ चव नाही तर आरोग्याची काळजीही घेते मखाना सलाद, झटपट तयार होते ही रेसिपी

Makhana Salad: केवळ चव नाही तर आरोग्याची काळजीही घेते मखाना सलाद, झटपट तयार होते ही रेसिपी

Feb 15, 2024, 05:48 PM IST

    • Healthy Snacks Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्हाला काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही मखाना सलाद बनवू शकता. ही रेसिपी खायला टेस्टी आहे झटपट तयार होते.
मखाना सलाद

Healthy Snacks Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्हाला काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही मखाना सलाद बनवू शकता. ही रेसिपी खायला टेस्टी आहे झटपट तयार होते.

    • Healthy Snacks Recipe: संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये तुम्हाला काही टेस्टी आणि हेल्दी खायचे असेल तर तुम्ही मखाना सलाद बनवू शकता. ही रेसिपी खायला टेस्टी आहे झटपट तयार होते.

Makhana Salad Recipe: जर तुम्ही संध्याकाळची थोडीशी भूक भागवण्यासाठी नाश्त्यासाठी काही हेल्दी रेसिपी शोधत असाल, तर तुम्ही प्रोटीन आणि कॅल्शियम युक्त मखाना सॅलडची ही रेसिपी ट्राय करू शकता. ही रेसिपी खायला खूप चविष्ट तर आहेच पण आरोग्यासाठी खूप फायदेशीर सुद्धा आहे. शिवाय ही रेसिपी पटकन तयार होते. ही रेसिपी तुमच्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच तुमचे वजन कमी करण्यास मदत करेल. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे मखाना सलाद

ट्रेंडिंग न्यूज

Litchi Shake: उन्हाळ्यात काही खास प्यावेसे वाटत असेल तर बनवा लिची शेक, खूप सोपी आहे रेसिपी

Sandalwood Face Pack: उन्हाळ्यात घामोळ्या आणि पिंपल्सपासून आराम देईल चंदन, पाहा कसा बनवायचा फेस पॅक

Yoga Mantra: उन्हाळ्यात तुमचे शरीर थंड ठेवतील ही ३ योगासनं, जाणून घ्या फायदे आणि करण्याची योग्य पद्धत

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

मखाना सलाद बनवण्यासाठी साहित्य

- मखाना

- बटर

- मशरूम

- ब्रोकोली

- शिमला मिरची

- बदाम

- काजू

- किशमिश

- पिस्ता

- चिलि फ्लेक्स

- काळे मीठ

- काळी मिरी पावडर

- चाट मसाला

मखाना सलाद बनवण्याची पद्धत

हे हेल्दी स्नॅक्स बनवण्यासाठी सर्वप्रथम मखाना एका कढईत घेऊन कोरडे भाजून घ्या आणि प्लेटमध्ये काढा. यानंतर पॅनमध्ये बटर घालून चिरलेले मशरूम, ब्रोकोली आणि शिमला मिरची घालून परतावे. यानंतर त्यात बदाम, काजू, किशमिश, पिस्ता घालून ते देखील भाजून घ्या. यानंतर कढईत चिली फ्लेक्स, काळे मीठ, काळी मिरी पावडर आणि चाट मसाला घालून मिक्स करा. आता त्यात आधीच भाजलेला मखाना घाला आणि पुन्हा एकदा सर्व चांगले मिक्स करा. तुमची टेस्टी आणि हेल्दी मखाना सलाद तयार आहे. हे संध्याकाळी नाश्त्यात खाण्यासाठी परफेक्ट स्नॅक्स आहे.

विभाग

पुढील बातम्या