Beetroot Pickle: जेवणाची चव द्विगुणीत करेल बीटरूटचे चटपटीत लोणचे, नोट करा सोपी रेसिपी
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beetroot Pickle: जेवणाची चव द्विगुणीत करेल बीटरूटचे चटपटीत लोणचे, नोट करा सोपी रेसिपी

Beetroot Pickle: जेवणाची चव द्विगुणीत करेल बीटरूटचे चटपटीत लोणचे, नोट करा सोपी रेसिपी

Published Feb 13, 2024 12:04 PM IST

Pickle Recipe: अनेक लोकांना सलादमध्ये बीटरूट खायला आवडत नाही. पण तुम्ही त्यापासून चटपटीत लोणचे बनवू शकता. जाणून घ्या बीटरूटच्या लोणच्याची रेसिपी.

बीटरूटचे लोणचे
बीटरूटचे लोणचे (freepik)

Beetroot Pickle Recipe: तुम्ही बीटरूटचा वापर पराठा किंवा कोशिंबीर, सलाद बनवण्यासाठी अनेक वेळा केला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का की बीटरूटपासून टेस्टी चटपटीत लोणचं सुद्धा बनवता येते. बीटरूट आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. सलाद मध्ये बीटरूट खायला आवडत नसले तर बीटरूटचे लोणचे खायला लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. हे लोणचे तुमची भूक तर वाढवतेच शिवाय ते तुमच्या रोजच्या जेवणाची चवही दुप्पट करते. हे लोणचे खायला जेवढे टेस्टी आहे तेवढेच बनवायलाही सोपे आहे. चला तर मग जाणून घ्या बीटरूटचे लोणचे कसे बनवायचे.

बीटरूटचे लोणचे बनवण्यासाठी साहित्य

- २ कप बीटरूट

- ८ लसूण पाकळ्या

- कढीपत्ता

- १ इंच आले

- ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- २ कप मोहरीचे तेल

- १ चमचा हळद

- २ चमचे काश्मिरी लाल मिरची

- २ चमचे मेथी दाणा

- बडीशेप

- ओवा

- अख्खे धणे

- अर्धा चमचा हिंग

- ३ चमचे आमचूर पावडर

- २ चमचे लोणच्याचा मसाला

- २ चमचे मोहरी

- २ टीस्पून व्हिनेगर

- चवीनुसार मीठ

बीटरूटचे लोणचे बनवण्याची पद्धत

बीटरूटचे लोणचे बनवण्यासाठी प्रथम बीटरूट धुवून त्याची साल काढून घ्या. आता बीटरूटचे लहान लहान तुकडे, स्लाइस किंवा फिंगर शेप मध्ये कापून घ्या. आता बीटरूट मलमलच्या कपड्यावर ठेवून २ ते ३ दिवस उन्हात ठेवा. यानंतर आले किसून घ्या आणि हिरवी मिरची बारीक चिरून घ्या. आता एका पॅनमध्ये २ कप मोहरीचे तेल घालून गरम करा. मोहरीचे तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका आणि तडतडू द्या. यानंतर कढीपत्ता, आले आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या. नंतर हळद आणि काश्मिरी तिखट घालून मिक्स करा. १५ मिनिटांनंतर या मिश्रणात उन्हात वाळवलेले बीटरूट घालून झाकण ठेवून २०-२५ मिनिटे शिजवा.

आता एक दुसरा पॅन गरम करा आणि त्यात मेथी दाणे, बडीशेप, ओवा आणि अख्खे धणे घालून भाजून घ्या. आता हे मसाले थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेवा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घ्या. आता बीटरूटमध्ये मीठ, लोणच्याचा मसाला आणि आमचूर पावडर घालून मिक्स करा. थोड्या वेळाने मिक्सरमध्ये बारीक केलेले मसाले घालून मिक्स करा. आता गॅस बंद करा. यानंतर दुसऱ्या पॅनमध्ये १ कप मोहरीचे तेल गरम करा. तयार केलेले लोणचे थंड करून बरणीत टाकल्यावर त्यात गरम केलेले तेल टाका. त्यानंतर हे लोणचे ४ ते ५ दिवस उन्हात ठेवा. तुमचे टेस्टी बीटरूटचे लोणचे तयार आहे.

Whats_app_banner