मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Badam Shake: उन्हाळ्यात अशा प्रकारे बनवा स्ट्रीट स्टाईल बदाम शेक, थंडावा देईल ही रेसिपी

Badam Shake: उन्हाळ्यात अशा प्रकारे बनवा स्ट्रीट स्टाईल बदाम शेक, थंडावा देईल ही रेसिपी

Jun 04, 2023, 05:48 PM IST

    • Summer Special Drinks: बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा स्थितीत त्याच्या मदतीने तुम्ही टेस्टी बदाम शेक बनवू शकता. ते बनवण्याची स्ट्रीट स्टाइल रेसिपी जाणून घ्या.
बदाम शेक

Summer Special Drinks: बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा स्थितीत त्याच्या मदतीने तुम्ही टेस्टी बदाम शेक बनवू शकता. ते बनवण्याची स्ट्रीट स्टाइल रेसिपी जाणून घ्या.

    • Summer Special Drinks: बदाम हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अशा स्थितीत त्याच्या मदतीने तुम्ही टेस्टी बदाम शेक बनवू शकता. ते बनवण्याची स्ट्रीट स्टाइल रेसिपी जाणून घ्या.

Street Style Badam Shake Recipe: उन्हाळ्यात थंड ड्रिंक्स छान लागतात. कोल्ड आणि हेल्दी ड्रिंक्स खूप रिफ्रेशिंग असतात. बदाम हे कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे हाडे मजबूत होतात. याशिवाय त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, व्हिटॅमिन ई, प्रोटीन, कॉपर, फायबर आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्हालाही काहीतरी थंड प्यावेसे वाटत असेल तर तुम्ही बदाम शेक बनवू शकता. स्ट्रीट स्टाईल रेसिपीने तुम्ही झटपट बनवू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

बदाम शेक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य

- दूध

- बदाम

- कस्टर्ड पावडर

- साखर

- वेलची

- ड्राय फ्रूट्स

कसा बनवायचा शेक

बदाम शेक बनवण्यासाठी प्रथम आदल्या दिवशी बदाम आणि वेलची भिजवावी. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी दूध चांगले उकळायला ठेवावे. नंतर एका छोट्या भांड्यात थोडे दूध घेऊन त्यात कस्टर्ड पावडर घाला. आता या कस्टर्ड पावडरचे मिश्रण उकळत्या दुधात मिक्स करा. या दुधातही साखर घाला. नंतर भिजवलेले बदाम सोलून वेलची आणि थोडे दूध घालून बारीक करा. ही पेस्टही उकळत्या दुधात मिक्स करा. आता दूध घट्ट होऊ द्या आणि नंतर त्यात काप केलेले बदाम घाला. हे दूध थंड होऊ द्या आणि नंतर ग्लासमध्ये घाला. बदामने सजवा आणि सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या