मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Natural Shampoo: थांबा! संत्र्याचे साल फेकू नका, त्यापासून बनवा शॅम्पू, मिळतील अनेक फायदे

Natural Shampoo: थांबा! संत्र्याचे साल फेकू नका, त्यापासून बनवा शॅम्पू, मिळतील अनेक फायदे

Dec 25, 2022, 07:02 PM IST

    • Hair Care Tips: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते आरोग्याबरोबरच त्वचा आणि केसांसाठीही चांगले असते. येथे संत्र्याच्या सालीचा शॅम्पू कसा बनवायचा ते पहा.
संत्र्याच्या सालपासून बनवा शॅम्पू

Hair Care Tips: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते आरोग्याबरोबरच त्वचा आणि केसांसाठीही चांगले असते. येथे संत्र्याच्या सालीचा शॅम्पू कसा बनवायचा ते पहा.

    • Hair Care Tips: संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते आरोग्याबरोबरच त्वचा आणि केसांसाठीही चांगले असते. येथे संत्र्याच्या सालीचा शॅम्पू कसा बनवायचा ते पहा.

Shampoo With Orange Peel: केस गळणे, स्प्लीट एंड किंवा केस अकाली पांढरे होणे या सर्व गोष्टी बदलेल्या जीवनशैलीसोबतच जास्त प्रमाणात केमिकल प्रोडक्ट वापरण्याशी संबंधित आहेत. केस आणि त्वचेशी संबंधित तुमच्या सर्व समस्यांचे समाधान तुम्हाला बाजारात वेगवेगळ्या उत्पादनांच्या रूपात सापडतात. पण तुम्हाला माहित आहे का की कधी कधी या सर्व गोष्टी तुमची समस्या वाढवू शकतात. होय, या सर्व गोष्टींमध्ये जास्त प्रमाणात रसायने असतात, ज्यामुळे तुमच्या केसांना हानी पोहोचते. अशा परिस्थितीत घरगुती उपाय नेहमीच उपयोगी पडतात. केसांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही संत्र्याच्या सालीचा वापर करू शकता. संत्र्याची साले अनेकदा फेकून दिली जातात. परंतु त्यांच्या मदतीने तुम्ही मास्क, सीरम यासारख्या गोष्टी तयार करू शकता. संत्र्याच्या सालीपासून शॅम्पू कसा तयार करायचा ते येथे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Healthy Heart: वाढत्या तापमानामुळे वाढू शकते हृदयाशी संबंधित समस्या, उन्हाळ्यात या टिप्सने हेल्दी ठेवा हार्ट

Virgin Mojito: घरी सोप्या पद्धतीने बनवा मार्केटसारखे व्हर्जिन मोईतो, नोट करा रेसिपी

Summer Hair Care: उन्हाळ्यात टाळूवर खूप घाम येतो का? ते कमी करण्यासाठी करा हे उपाय

Joke of the day : एका लग्नात संतू खूप वेळ जेवत बसलेला असतो, त्याला पाहून अंतू म्हणतो…

हा शॅम्पू बनवण्यासाठी तुम्हाला लागेल...

- संत्र्याची साल

- कोरफडीचे पान

- मेथीचे दाणे

- रीठा

- तांदळाचे पाणी

कसे बनवावे

हे करण्यासाठी मेथीचे दाणे काही वेळ भिजत ठेवा आणि तांदळाचे पाणीही तयार करा. आता एका पॅनमध्ये संत्र्याची साले टाका. नंतर रीठा ठेचून त्यात भिजवलेले मेथीचे दाणे पाण्यासोबत टाका. त्यात एक ते दीड ग्लास तांदळाचे पाणी मिक्स करा आणि गरम करा. कोरफडीचे पान चांगले धुतल्यानंतर मधोमध कापून घ्या. नंतर हे सुद्धा पाण्यात टाका. हाताने चांगले मिक्स करा. तुमचे शॅम्पू तयार आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या