मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Reverse Washing : आधी शॅम्पू की कंडिशनर? तुमच्या केसांनुसार कोणती आहे योग्य स्टेप?

Reverse Washing : आधी शॅम्पू की कंडिशनर? तुमच्या केसांनुसार कोणती आहे योग्य स्टेप?

Nov 02, 2022, 12:33 PM IST

    • Hair Care Tips: शॅम्पूने केसांना तेलाचा थर काढून ड्राय करू शकते. हे टाळण्यासाठी कंडिशनरचा वापर केला जातो. जर कंडिशनर तुमचे केस चिकट करत असेल तर तुम्ही रिव्हर्स वॉशिंग करू शकता.
रिव्हर्स वॉशिंग

Hair Care Tips: शॅम्पूने केसांना तेलाचा थर काढून ड्राय करू शकते. हे टाळण्यासाठी कंडिशनरचा वापर केला जातो. जर कंडिशनर तुमचे केस चिकट करत असेल तर तुम्ही रिव्हर्स वॉशिंग करू शकता.

    • Hair Care Tips: शॅम्पूने केसांना तेलाचा थर काढून ड्राय करू शकते. हे टाळण्यासाठी कंडिशनरचा वापर केला जातो. जर कंडिशनर तुमचे केस चिकट करत असेल तर तुम्ही रिव्हर्स वॉशिंग करू शकता.

Reverse Washing Benefits for Hair : रेशमी आणि चमकदार केस मिळविण्यासाठी लोक विविध प्रकारचे शॅम्पू आणि कंडिशनर वापरतात. शॅम्पूचे काम केसांमधील धूळ, घाण आणि घाम काढून टाकणे आहे. त्यांचा वापर केल्याने केसांचे तेलही निघून जाते. हे संतुलित करण्यासाठी, आपण कंडिशनर वापरतो. त्यामध्ये नैसर्गिक तेले आणि अशा काही गोष्टी असतात ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात. केस धुतल्यानंतरही कंडिशनरचा हलका थर केसांवर राहतो. शॅम्पू आधी आणि नंतर कंडिशनर लावणे गरजेचे नाही. रिव्हर्स वॉशिंगमध्ये ही प्रक्रिया उलट केली जाते. त्याचे फायदे जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Healthy Heart: वाढत्या तापमानामुळे वाढू शकते हृदयाशी संबंधित समस्या, उन्हाळ्यात या टिप्सने हेल्दी ठेवा हार्ट

Virgin Mojito: घरी सोप्या पद्धतीने बनवा मार्केटसारखे व्हर्जिन मोईतो, नोट करा रेसिपी

Summer Hair Care: उन्हाळ्यात टाळूवर खूप घाम येतो का? ते कमी करण्यासाठी करा हे उपाय

Joke of the day : एका लग्नात संतू खूप वेळ जेवत बसलेला असतो, त्याला पाहून अंतू म्हणतो…

- शॅम्पू केसांमधला तेलाचा थर काढून टाकतो. यामुळे तुमचे केस ड्राय आणि फ्रिजी दिसू शकतात. हे टाळण्यासाठी लोक कंडिशनर लावतात. त्याच वेळी काही लोकांचे केस अधिक तेलकट किंवा कंडिशनरने चिकटलेले दिसतात. अशा वेळी रिव्हर्स वॉशिंग किंवा प्री कंडिशनिंग हा एक मार्ग आहे.

- रिव्हर्स वॉशिंग करण्याचे दोन मार्ग आहेत. प्रथम शॅम्पू करण्यापूर्वी ५ किंवा १० मिनिटे केसांना तेल लावा. लक्षात ठेवा, तेल जास्त वेळ डोक्यावर ठेवण्याची गरज नाही. हे देखील आवश्यक नाही की तुम्ही टाळूवर लावावे. केसांना तेलाचा थर नीट लावा जेणेकरून शॅम्पू केल्यानंतर केस जास्त कोरडे होणार नाहीत.

- दुसरे म्हणजे आधी केसांना कंडिशनर लावा. यानंतर केस शॅम्पूने धुवा. असे केल्याने तुम्हाला केसांमध्ये व्हॉल्यूम जाणवेल, ते रेशमी दिसतील आणि केस जास्त ग्रीसी देखील होणार नाहीत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या