मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Jawari Upma Recipe: वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो ज्वारीचा उपमा! नोट करा रेसिपी

Jawari Upma Recipe: वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो ज्वारीचा उपमा! नोट करा रेसिपी

May 05, 2023, 01:18 PM IST

    • Breakfast Recipe: ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते. ज्वारीच्या उपमामध्ये भाज्या वापरून त्याला आणखीनच पौष्टिक बनवता येते.
ज्वारीचा उपमा (Pixabay)

Breakfast Recipe: ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते. ज्वारीच्या उपमामध्ये भाज्या वापरून त्याला आणखीनच पौष्टिक बनवता येते.

    • Breakfast Recipe: ज्वारीमध्ये भरपूर फायबर असते. ज्वारीच्या उपमामध्ये भाज्या वापरून त्याला आणखीनच पौष्टिक बनवता येते.

Healthy Recipe: दिवसाची निरोगी सुरुवात करण्यासाठी उत्तम हेल्दी नाश्ता करणे गरजेचे आहे. तुम्ही नाश्त्यात ज्वारीचा उपमा बनवू शकता. चवीने परिपूर्ण ज्वारीचा उपमा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्वारीचा उपमा बनवायला खूप सोपा आहे आणि फायबर समृद्ध असल्याने पचन सुधारण्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्वारीच्या उपमाचे सेवन केल्यानेही वजन कमी होण्यास मदत होते. हा उपमा बनवताना भाज्यांचाही वापर केला जातो. त्यामुळे ही डिश अजूनच हेल्दी होते. या लेखात नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही हा उपमा सहज तयार करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

लागणारे साहित्य

ज्वारीचे पीठ - १ वाटी

कांदा बारीक चिरून - १/२ कप

रवा - १/२ कप

उकडलेले मटार - १/२ कप (पर्यायी)

हिरवी मिरची पेस्ट - २ टीस्पून

हिरवी कोथिंबीर चिरलेली - २ चमचे

हिंग - १-२ चिमूटभर

मोहरी - १ टीस्पून

उडीद डाळ - १ टीस्पून

कढीपत्ता – ८-१० पानं

लिंबू - १

तेल - १-२ चमचे

मीठ - चवीनुसार

Chole Roll Recipe: नाश्त्यासाठी बनवा स्वादिष्ट छोले रोल! नोट करा सोपी रेसिपी

जाणून घ्या रेसिपी

प्रथम कांदा, कढीपत्ता बारीक चिरून घ्या. यानंतर, मटार उकडवा. आता कढईत तेल टाकून गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी आणि उडीद डाळ घालून काही सेकंद परतून घ्या. मोहरी तडतडायला लागल्यावर त्यात कढीपत्ता आणि हिंग घाला आणि चमच्याने ढवळत असताना आणखी काही सेकंद तळा. यानंतर पॅनमध्ये कांदा टाका आणि १ मिनिट परतून घ्या.कांदा मऊ झाल्यावर त्यात रवा घालून चमच्याने मिक्स करून मध्यम आचेवर तळून घ्या.

Onion Tomato Chutney Recipe: उन्हाळ्यात बनवा कांदा आणि टोमॅटोची चटणी! चवीसोबत मिळेल पोषण

यानंतर ज्वारीचे पीठ घालून ढवळत असताना मिक्स करून २ मिनिटे परतून घ्या. यानंतर हिरवी मिरची पेस्ट, वाटाणे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करून शिजवा. आता पॅनमध्ये ३ कप पाणी घाला आणि ढवळत असताना मिक्स करा. यानंतर उपमा मध्यम आचेवर २-३ मिनिटे शिजू द्या. शेवटी लिंबाचा रस घाला आणि गॅस बंद करा. चव आणि पौष्टिकतेने परिपूर्ण ज्वारी उपमा सर्व्ह करण्यासाठी तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या