मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  ब्रेकफास्टसाठी परफेक्ट आहे स्टफ्ड ओट्स चीला, सोप्या रेसिपीने बनवा झटपट

ब्रेकफास्टसाठी परफेक्ट आहे स्टफ्ड ओट्स चीला, सोप्या रेसिपीने बनवा झटपट

Dec 05, 2022, 09:32 AM IST

    • Healthy Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काही हेल्दी बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी. टेस्ट सोबतच हेल्थ मिळवायचे असेल तर ट्राय करा स्टफ्ड ओट्स चीला.
स्टफ्ड ओट्स चीला

Healthy Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काही हेल्दी बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी. टेस्ट सोबतच हेल्थ मिळवायचे असेल तर ट्राय करा स्टफ्ड ओट्स चीला.

    • Healthy Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्यात काही हेल्दी बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी आहे तुमच्यासाठी. टेस्ट सोबतच हेल्थ मिळवायचे असेल तर ट्राय करा स्टफ्ड ओट्स चीला.

Stuffed Oats Cheela Recipe: जर तुम्ही फिटनेस फ्रिक असाल आणि तुमच्या नाश्त्याच्या प्लेटमध्ये सर्व्ह करण्यासाठी हेल्दी आणि चविष्ट पर्याय शोधत असाल तर स्टफ्ड ओट्स चीला ट्राय करा. ओट्सचे पीठ आणि भाज्यांच्या स्टफिंगने बनवलेला हा चीला खायला खूप चविष्ट तर आहेच पण बनवायलाही खूप सोपा आहे. हे स्टफ्ड ओट्स चीला रेसिपी त्या लोकांसाठी आयडियल ऑप्शन आहे, जे आरोग्याची प्रति खूप जागरुक आहेत. चला तर मग उशीर न करता स्टफ्ड ओट्स चीला कसा बनवायचा ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

joke of the day : तू अजून लग्न का केलं नाहीस, असं जेव्हा कोकिळा कावळ्याला विचारते…

Mango Lassi Recipe: उन्हाळ्याच्या दिवसांत ट्राय करा ७ प्रकारची मँगो लस्सी! मूडही फ्रेश होईल अन् शरीर थंड राहील!

International Museum Day 2024: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन? जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि थीम

Egg Kofta Curry: अंडा कोफ्ता करी सोबत बनवा वीकेंड खास, बनवायला खूप सोपी आहे रेसिपी

स्टफ्ड ओट्स चीला बनवण्यासाठी साहित्य

- १ कप ओट्स पावडर

- २ टीस्पून बेसन

- १ टीस्पून तेल

- १/२ कप चिरलेल्या हिरव्या मिरच्या

- १ कप पाणी

- १/२ टीस्पून हळद

- १/२ टीस्पून हिंग

- चिरलेली कोथिंबीर

- चवीनुसार मीठ

- ३ टीस्पून तेल

भाज्यांच्या स्टफिंगसाठी

- १/२ कप हिरवे वाटाणे (उकडलेले)

- १/२ कप बटाटे (उकडलेले आणि चिरलेले)

- १/२ टीस्पून तेल

- १ टीस्पून चिरलेला कांदा

- १ टीस्पून टोमॅटो (बारीक चिरलेला)

- १ टीस्पून हळद

- १/२ टीस्पून गरम मसाला

- तिखट

- चिमूटभर हिंग

- चवीनुसार मीठ

- चिंचेची चटणी (सर्व्ह करण्यासाठी)

 

स्टफ्ड ओट्स चीला बनवण्याची पद्धत

स्टफड ओट्स चीलाचे प्रथम स्टफिंग बनवून घ्या. त्यासाठी एका कढईत तेल गरम करून त्यात हळद, गरम मसाला, हिंग, कांदा, टोमॅटो घालून अर्धा मिनिट परतून घ्या. यानंतर मटार, बटाटे, चवीनुसार मीठ आणि तिखट घालून २ मिनिटे शिजवा. यानंतर एका भांड्यात बेसन, हिरवी मिरची, हिंग, धने, हळद, ओट्स पावडर, तेल, पाणी आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. आता एका नॉन-स्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यात चीलाचे मिश्रण टाकून त्याला गोल आकार द्या. दुसऱ्या बाजूने पलटून दोन्ही बाजूंनी भाजण्यासाठी ठेवा. चीलामध्ये स्टफिंग टाका, घडी करून पॅनमधून बाहेर काढा. हे तयार स्टफ केलेले ओट्स चीला चिंचेच्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

 

विभाग

पुढील बातम्या