मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Dahi Ke Aloo Recipe: जेवणासाठी बनवा 'दही आलू'ची भाजी, नोट करा हटके रेसिपी!

Dahi Ke Aloo Recipe: जेवणासाठी बनवा 'दही आलू'ची भाजी, नोट करा हटके रेसिपी!

Mar 26, 2024, 01:47 PM IST

    • Punjabi Style Recipe: अनेक वेळा तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही दही आलू /बटाटयाची भाजी तयार करून खाऊ शकता.
how to make dahi ke aloo (freepik)

Punjabi Style Recipe: अनेक वेळा तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही दही आलू /बटाटयाची भाजी तयार करून खाऊ शकता.

    • Punjabi Style Recipe: अनेक वेळा तीच तीच भाजी खाऊन कंटाळा येतो. अशावेळी तुम्ही दही आलू /बटाटयाची भाजी तयार करून खाऊ शकता.

Easy Dinner/Lunch Recipe: रेगुलर भाजी खाऊन कंटाळा येतो. उन्हाळा सुरु आहे. उन्हाळयात भाज्या बाजारात उपलब्ध होत नाहीत. मग अशावेळी काय करावं समजत नाही. जी उपल्बध असेल ते भाजी बनवली जाते. पण कोणतीही भाजी खायला आवडत नसेल तर तेव्हा तुम्ही पटकन दही आणि बटाट्यापासून एक अप्रतिम भाजी तयार करून खाऊ शकता. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात दही बटाटे किंवा दही आलूची भाजी मोठ्या आनंदाने खाल्ले जातात. ही भाजी आहे जी तुम्हीचपाती, किंवा भातासोबत खाऊ शकता. विशेष म्हणजे दही बटाटे बनवणे अगदी सोपे आहे. घरात भाजी नसते तेव्हा ही कमी साहित्यात तुम्ही ही भाजी खाऊ शकता. ही भाजी चवीला एकदम वेगळी लागते. चला जाणून घेऊया सुपर टेस्टी दही बटाटे कसे बनवायचे?

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

कशी बनवायची भाजी?

> दही आलू/ दही बटाटे बनवण्यासाठी प्रथम बटाटे उकडून घ्या. २ लोकांसाठी बनवायचं असल्यास २ मध्यम बटाटे पुरेसे आहेत.

> आता दही फेटून घ्या, थोडे पातळ करा आणि मसाले तयार करा.

> दही बटाटे बनवण्यासाठी १ मध्यम कांदा, हिरवी मिरची आणि लसूणच्या ७-८ पाकळ्या चिरून घ्या.

restaurant style paneer sabji: घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल पनीर करी, जाणून घ्या रेसिपी!

> बटाटे उकडल्यानंतर ते सोलून त्याचे जाड तुकडे करा.

> एक कढई घ्या आणि त्यात मोहरीचे तेल घाला. तेल गरम झाल्यावर त्यात हिंग व जिरे घाला.

> आता बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि लसूण घालून परतून घ्या.

> त्यात हळद आणि थोडी लाल मिरची घालून परतावे आणि नंतर त्यात बटाटे घाला.

> मसाल्यामध्ये बटाटे घालून ५ मिनिटे शिजू द्या आणि नंतर फेटून तयार केलेले दही घाला.

> दही घालताच भाजी सतत ढवळत राहणे गरजेचे आहे, नाहीतर दही फटू शकते.

Oats Paratha Recipe: विकेंडला नाश्त्यात बनवा सर्वात आरोग्यदायी पराठा, जाणून घ्या रेसिपी!

> सतत मध्यम आचेवर दही ढवळत राहा आणि नंतर १-२ उकळी येईपर्यंत ढवळत राहा.

> तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ ठेवू शकता. सुमारे १० मिनिटे उकळल्यानंतर, मीठ घाला.

> दही बटाटे आणखी दोन मिनिटे उकळू द्या, नंतर हिरवी कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा.

> स्वादिष्ट दही आलू/ दही बटाटे तयार आहेत, ते तुम्ही चपाती किंवा भातासोबत खाऊ शकता.

पुढील बातम्या