मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  या नॅचरल गोष्टींपासून घरीच बनवा हेअर स्पा क्रीम, असे करा अप्लाय

या नॅचरल गोष्टींपासून घरीच बनवा हेअर स्पा क्रीम, असे करा अप्लाय

Sep 28, 2022, 04:58 PM IST

    • Hair Spa Tips : केसांची काळजी घेताना हेअर स्पाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही हे घरच्या घरी नॅचरल गोष्टी वापरुन करु शकता. जाणून घ्या.
होममेड हेअर स्पा क्रीम

Hair Spa Tips : केसांची काळजी घेताना हेअर स्पाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही हे घरच्या घरी नॅचरल गोष्टी वापरुन करु शकता. जाणून घ्या.

    • Hair Spa Tips : केसांची काळजी घेताना हेअर स्पाला विशेष महत्त्व आहे. तुम्ही हे घरच्या घरी नॅचरल गोष्टी वापरुन करु शकता. जाणून घ्या.

Homemade Hair Spa Cream : हेअर स्पा साठी वेळ नाही? तसे असल्यास काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही हेअर स्पा घरीच करू शकता. यासाठी तुम्हाला काही नैसर्गिक गोष्टींची आवश्यकता असेल, ज्याचा वापर करून तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा क्रीम बनवू शकता. बदलत्या ऋतूमध्ये तुम्ही हे हेअर क्रीम महिन्यातून दोनदा लावावे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हे नैसर्गिक हेअर स्पा क्रीम टाळूवरही लावू शकता. चला तर जाणून घ्या हेअर स्पा क्रीम कशी बनवायची

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

कोकोनट हेअर स्पा क्रीम

कोकोनट हेअर स्पा क्रीम बनवण्यासाठी प्रथम तुम्हाला नारळाचे दूध आवश्यक आहे. अर्धा नारळ किसून घ्या आणि पातळ कापडात टाकून दूध काढा. यानंतर त्यात दोन चमचे कोरफडचा गर घाला. यानंतर त्यात तीन चमचे मुलतानी माती घाला. जर तुमचे स्काल्प ऑइली असेल तर तुम्ही त्यात टी ट्री ऑइलचे ६ ते ७ थेंब देखील घालू शकता. त्यात दोन चमचे दही घालून एक केळी मॅश करून टाका. ते क्रीम स्वरूपात तयार करा.

कसे लावावे

हे क्रीम तुमच्या केसांवर लावण्यासाठी तुम्हाला तुमचे केस धुवून स्वच्छ करावे लागतील. लक्षात ठेवा की तुमच्या केसांमध्ये धूळ, घाण किंवा तेल नसावे. यानंतर, ओल्या केसांना पार्टिशनमध्ये डिव्हाइड करुन केसांना क्रीम लावा. तुम्ही ते स्काल्पवरही लावू शकता. २० मिनिटे राहू द्या. त्यानंतर नॉर्मल पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही शॅम्पूने केसांपासून ते पूर्णपणे काढून टाकू शकता. पण कंडिशनर वापरू नका. तुमचे केस खूप मऊ दिसतील.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या