मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  केस झाले ड्राय अन् फ्रिझी? या होममेड हेअर मास्कने मिळवा स्पासारखा रिझल्ट

केस झाले ड्राय अन् फ्रिझी? या होममेड हेअर मास्कने मिळवा स्पासारखा रिझल्ट

Jun 08, 2022, 03:16 PM IST

    • कोरड्या केसांना चमक आणायची असेल तर कमीत कमी केमिकल्सचा वापर करा. घरच्या घरी नॅचरल पद्धतीने हेअर मास्क बनवणे हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. हे देतील तुम्हाला अगदी स्पा सारखा रिझल्ट. ट्राय करा हे हेअर मास्क.
होममेड हेअर मास्क

कोरड्या केसांना चमक आणायची असेल तर कमीत कमी केमिकल्सचा वापर करा. घरच्या घरी नॅचरल पद्धतीने हेअर मास्क बनवणे हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. हे देतील तुम्हाला अगदी स्पा सारखा रिझल्ट. ट्राय करा हे हेअर मास्क.

    • कोरड्या केसांना चमक आणायची असेल तर कमीत कमी केमिकल्सचा वापर करा. घरच्या घरी नॅचरल पद्धतीने हेअर मास्क बनवणे हे सर्वात बेस्ट ऑप्शन आहे. हे देतील तुम्हाला अगदी स्पा सारखा रिझल्ट. ट्राय करा हे हेअर मास्क.

Homemade Hair Mask : उन्हाळ्यात त्वचा असो वा केस, सर्वांची कंडीशन खराब होते. घामाच्या चिपचिपपणासोबतच ड्युमिडीटीचा सुद्धा केसांवर वाईट परिणाम होतो. अशा स्थितीत बाजारातील महागड्या स्पाचा परिणाम दोन दिवसांपेक्षा जास्त काळ दिसून येत नाही. घरी काही नैसर्गिक हेअरमास्क कसे बनवायचे ते शिकले तर चांगले होईल. त्यात हानिकारक रसायने नसतात. शिवाय फारसा पैसाही खर्च होत नाही. किचनमध्ये असलेल्या अनेक गोष्टी तुमच्या उपयोगी पडू शकतात. तुमच्या केसांना तेल लावणे, माइल्ड शाम्पूसह हे होममेड नॅचरल कंडिशनर तुमच्या केसांना चमक परत आणू शकते.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

केळीचा मास्कः जर केळी जास्त पिकली असेल तर ते फेकून देण्याऐवजी तुम्ही त्यातून हेअर मास्क बनवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही नॉर्मल केळी देखील घेऊ शकता. एक केळी मॅश करा आणि त्यात ऑलिव्ह ऑईल किंवा खोबरेल तेल मिक्स करा. यात थोडेसे दूध सुद्धा मिक्स करा. ते चांगले फेटा आणि केसांना लावा. केसांची बट घेऊन यावर ही पेस्ट चांगली प्रेस करून लावा. साधारण अर्धा तास तसंच राहू द्या आणि मग धुवा.

दह्याचा मास्कः दही हे केसांसाठी खूप चांगले कंडिशनर मानले जाते. हे लावणे देखील खूप सोपे आहे. सिंपली एका वाटीत दही घेऊन फेटून घ्या. तुम्ही यात थोडे दूध मिक्स करू शकता. सोबतच थोडेसे सरसो, ऑलिव्ह किंवा नारळाचे तेल, जे तुमच्याकडे असेल ते यात टाका. हे मिक्स करून केसांवर हेअर पॅक सारखे लावा. अर्धा तास तसेच राहू ज्या. नंतर शॅम्पूने केस धुवून घ्या.

केसांची प्रीकंडिशनिंगः शॅम्पू करण्यापूर्वी केसांची प्रीकंडिशनिंग करणे सुद्धा आवश्यक आहे. यासाठी केसांना तेल लावा आणि १५ मिनिटे राहू द्या. त्यानंतर शॅम्पू करा. नेहमी शॅम्पूनंतर कंडिशनर लावत असाल तर कधी कधी आधी कंडिशनर वापरण्याचा प्रयत्न करा आणि नंतर शॅम्पू करा.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या