मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Beetroot Rasam Recipe: टोमॅटो ऐवजी बीटापासून बनवा रसम! नोट करा सोपी रेसिपी

Beetroot Rasam Recipe: टोमॅटो ऐवजी बीटापासून बनवा रसम! नोट करा सोपी रेसिपी

Feb 02, 2023, 02:03 PM IST

    • तुम्ही बीटचा रस, कोशिंबीर खाल्ली असेल, पण आज एक नवीन रेसिपी करून पहा. याचे नाव बीट रसम आहे जे खूप चवदार आणि फायदेशीर आहे.
Beetroot Rasam (Freepik)

तुम्ही बीटचा रस, कोशिंबीर खाल्ली असेल, पण आज एक नवीन रेसिपी करून पहा. याचे नाव बीट रसम आहे जे खूप चवदार आणि फायदेशीर आहे.

    • तुम्ही बीटचा रस, कोशिंबीर खाल्ली असेल, पण आज एक नवीन रेसिपी करून पहा. याचे नाव बीट रसम आहे जे खूप चवदार आणि फायदेशीर आहे.

बीट हे एक सुपरफूड आहे जे आरोग्यासाठी अनेक फायदे देते. अनेकांना ते सॅलडच्या स्वरूपात खातात तर, काहीजण त्याचा ज्यूस करून पितात तर काहीजण त्याची भाजी करतात. याचे सेवन केल्याने तुम्हाला जीवनसत्त्वे मिळतात, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस यासह इतर अनेक पोषक घटक मिळतात, यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. आता जर तुम्ही पुन्हा पुन्हा बीट सॅलड, ज्यूस बनवून खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही त्याची मजेदार रसम देखील बनवू शकता. रसम हा एक दक्षिण भारतीय पदार्थ आहे ज्यामध्ये बीटचे मिश्रण वापरले जाऊ शकते. हे खरच खूप चविष्ट आणि आरोग्यदायी आहे. रेसिपी जाणून घ्या.

ट्रेंडिंग न्यूज

Paneer Bhurji Recipe: लंचसाठी बनवा अमृतसरी पनीर भुर्जी, पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी

International Day of Light: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

joke of the day : गझल आणि भाषणात काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

National Dengue Day 2024: राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे उद्देश काय? हा आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

साहित्य

चिरलेलं बीट - १ वाटी

नारळ - दोन चमचे

तेल - १ ते २ टीस्पून

मोहरी - १/२ टीस्पून

जिरे - १/२ टीस्पून

उडीद डाळ - १/२ टीस्पून

एक चिमूटभर हिंग

लसूण पाकळ्या - ६ ठेचून

कढीपत्ता - १५ ते २० पानं

अर्धा कांदा - बारीक चिरून

दोन हिरव्या मिरच्या

चिंचेचा रस एक कप

चवीनुसार मीठ

हळद अर्धा टीस्पून

१/२ टीस्पून मिरची पावडर

पुदीना पानं

कोथिंबीर

बीट रसम रेसिपी

बीट सोलून कापून घ्या, थोडे पाणी घालून १० मिनिटे शिजवा आणि नंतर थंड होण्यासाठी ठेवा. आता २ चमचे खोबरे मिक्स करून प्युरी बनवा. आता एक मोठा कढई घेऊन त्यात एक छोटा चमचा तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, उडीद डाळ आणि हिंग टाका. चिरलेल्या लसणाच्या कळ्या आणि कढीपत्ता घाला, लसूण हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. बारीक चिरलेला कांदा आणि चिरलेली मिरची घालून थोडा वेळ परतून घ्या. आता त्यात एक वाटी चिंचेचा रस, मीठ आणि हळद घालून मिक्स करा. ५ मिनिटे उकळवा आणि त्यात तयार बीट प्युरी घाला. रसम चांगली शिजण्यासाठी थोडे पाणी घालून ५ मिनिटे उकळू द्या. आता मिरची पावडर आणि पुदिन्याची पाने घालून उकळवा. आता शेवटी चिरलेली कोथिंबीर घाला आणि मीठ तपासा, गरम बीट रसम तयार आहे.

 

 

विभाग

पुढील बातम्या