मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी रोज खा या गोष्टी, गुडघ्यांपर्यंत होतील लांब

Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी रोज खा या गोष्टी, गुडघ्यांपर्यंत होतील लांब

Jan 02, 2023, 02:09 PM IST

    • Healthy Hair Growth: प्रत्येक मुलीला लांब केस आवडतात. बाजारात केसांसाठी अनेक प्रॉडक्ट मिळत असले तरी लांब केसांसाठी तुम्ही काय खाता हेही महत्त्वाचे आहे.
केसांच्या वाढीसाठी फूड

Healthy Hair Growth: प्रत्येक मुलीला लांब केस आवडतात. बाजारात केसांसाठी अनेक प्रॉडक्ट मिळत असले तरी लांब केसांसाठी तुम्ही काय खाता हेही महत्त्वाचे आहे.

    • Healthy Hair Growth: प्रत्येक मुलीला लांब केस आवडतात. बाजारात केसांसाठी अनेक प्रॉडक्ट मिळत असले तरी लांब केसांसाठी तुम्ही काय खाता हेही महत्त्वाचे आहे.

Food for Hair Growth: लांब, निरोगी केस हे प्रत्येक मुलीचे स्वप्न असते. केसांच्या वाढीसाठी पोषक आहार, उत्तम दर्जाची उत्पादने आणि योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. जरी बाजारात मिळणारे अनेक प्रोडक्ट लांब केस देण्याचे वचन देतात, पण यासह आहाराची काळजी घेणे सुद्धा आवश्यक आहे. येथे काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला लांब केस मिळू शकतात.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

नट्स

बदाम, अक्रोड यांसारखे नट्स हे केसांच्या वाढीसाठी प्रसिद्ध आयुर्वेदिक अन्न आहेत. हे लोह, बायोटिन आणि सल्फरयुक्त पदार्थ तुमचे केस जलद आणि दाट होण्यास मदत करतात. बदाम मध्ये ओमेगा ३ आणि ६ फॅटी अॅसिड असतात, जे रक्त प्रवाहात मदत करतात आणि त्यामुळे केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात.

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असतात, ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांच्या वाढीसाठी पालक उत्तम आहे. यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी केसांच्या फोलिकल्ससाठी आरोग्यदायी आहे.

बेरीज

बेरीजमध्ये भरपूर जीवनसत्त्वे असतात आणि त्यात अँटि ऑक्सिडंट गुणधर्म असतात. विशेषत: ब्लॅकबेरी, जे केसांच्या वाढीसाठी नैसर्गिक अन्न म्हणून ओळखले जाते. हे कोलेजन उत्पादनास प्रोत्साहन देतात. स्ट्रॉबेरी हे व्हिटॅमिन सी चा एक उत्तम स्त्रोत आहे, जो केसांच्या वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी आणि कोंड्यावर उपचार करण्यासाठी ओळखला जातो.

रताळे

रताळे बीटा-कॅरोटीनने भरलेले असतात, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतर करते, ज्यामुळे केसांची चांगली वाढ होते. एका मध्यम रताळ्यामध्ये पुरेसे बीटा-कॅरोटीन असते, जे तुमच्या शरीराला व्हिटॅमिन ए ची गरज ४ पट पुरवते. संशोधनानुसार व्हिटॅमिन ए सीबमचे उत्पादन वाढवते, जे केस निरोगी ठेवण्यास मदत करते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या