मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Foundation Hacks : नवरात्रीत मेकअपच टेन्शन विसरा, फाउंडेशनचे हे हॅक्स देतील परफेक्ट लूक

Foundation Hacks : नवरात्रीत मेकअपच टेन्शन विसरा, फाउंडेशनचे हे हॅक्स देतील परफेक्ट लूक

Sep 23, 2022, 10:56 AM IST

    • Makeup Tips for Navratri : नवरात्रीच्या दरम्यान झटपट मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही शोधत असाल तर तुमचा शोध थांबवा. मेकअपचा बेस असलेले फाउंडेशन लावण्याचे हे हॅक्स तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो आणतील.
मेकअप टिप्स

Makeup Tips for Navratri : नवरात्रीच्या दरम्यान झटपट मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही शोधत असाल तर तुमचा शोध थांबवा. मेकअपचा बेस असलेले फाउंडेशन लावण्याचे हे हॅक्स तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो आणतील.

    • Makeup Tips for Navratri : नवरात्रीच्या दरम्यान झटपट मेकअप करण्यासाठी वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही शोधत असाल तर तुमचा शोध थांबवा. मेकअपचा बेस असलेले फाउंडेशन लावण्याचे हे हॅक्स तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो आणतील.

Party Makeup Basic Tips : दांडियाशिवाय नवरात्र अपूर्ण आहे. आणि दांडिया खेळायला जायचं म्हणजे परफेक्ट रेडी होणे आलच. त्यासाठी मेकअपच्या काही टिप्स तुम्हाला आतापासूनच शिकून घ्याव्या लागतील. जरी तुम्ही मेकअपमध्ये तज्ञ नसाल तरीही तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त बेसिक गोष्टींची जाणीव असणे आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही चुका टाळू शकता. जर तुम्हाला साधा मेकअप लुक आवडत असेल तर तुम्हाला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमचा मेकअप फक्त लाँग लास्टिंग होणार नाही तर तुम्हाला एक परफेक्ट लूक देखील मिळेल. चला, जाणून घ्या मेकअपच्या काही सोप्या टिप्स

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

प्राइमर आणि फाउंडेशन ब्लेंड करा

ऑइल किंवा पाणी, तुमचा प्राइमर आणि फाउंडेशन एकच बेस असावा, अन्यथा ते एकमेकांमध्ये मिसळणार नाहीत आणि तुमच्या चेहऱ्याशी चांगल्या प्रकारे मॅच होणार नाही. ज्यामुळे तुमचा चेहरा विचित्र दिसेल.

परफेक्ट कव्हरेज

तुमचा फाउंडेशन लावताना तुम्हाला पूर्ण कव्हरेज हवे असल्यास, तुमच्या बोटांचा वापर करा. जर तुम्हाला बोटांनी फाउंडेशन कसे लावायचे हे माहित नसेल तर तुम्ही ब्रश देखील वापरू शकता.

खालच्या बाजूने लावा फाउंडेशन

नेहमी डाऊनवर्ड स्ट्रोक वापरून फाउंडेशन लावा. आपल्यापैकी बहुतेकांच्या चेहऱ्यावर केसांचा पातळ थर असतो आणि वरच्या दिशेने फाउंडेशन लावल्याने केसांचे पट्टे वेगळे दिसतात. अशा वेळी तुम्हाला त्रास होऊ शकतो.

कन्सीलर फक्त मार्क्सवर

हा हॅक त्या दिवसांसाठी आहे, जेव्हा तुम्हाला कुठेतरी जायला उशीर झाला आहे किंवा तुमचे कन्सीलर व्यवस्थित लावायला खूप कंटाळा आला आहे. फक्त थोडे कन्सीलर लावा. जिथे खुणा असतील त्यावर बीबी क्रीम लावा. तुम्ही तयार आहात.

फेस पावडर

फेस पावडरचे दोन प्रकार आहेत - लूज पावडर आणि प्रेस्ड पावडर. लूज पावडरचा वापर मुळात मेकअप सेट करण्यासाठी आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी केला जातो. तर प्रेस्ड पावडर टचअप आणि ग्लोइंग चीकसाठी वापरली जाते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या