मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  फाउंडेशन अप्लाय करण्यापूर्वी करू नका या कॉमन मिस्टेक, बिघडू शकतो मेकअप

फाउंडेशन अप्लाय करण्यापूर्वी करू नका या कॉमन मिस्टेक, बिघडू शकतो मेकअप

Jun 27, 2022, 04:10 PM IST

    • मेकअपचा बेस म्हणजे फाउंडेशन लावणे असते. ते लावतानाच जर काही चुका केल्या तर तुमचा पूर्ण मेकअप खराब होऊ शकतो. फाउंडेशन लावताना चुकूनही या चुका करू नका.
मेकअप हॅक्स

मेकअपचा बेस म्हणजे फाउंडेशन लावणे असते. ते लावतानाच जर काही चुका केल्या तर तुमचा पूर्ण मेकअप खराब होऊ शकतो. फाउंडेशन लावताना चुकूनही या चुका करू नका.

    • मेकअपचा बेस म्हणजे फाउंडेशन लावणे असते. ते लावतानाच जर काही चुका केल्या तर तुमचा पूर्ण मेकअप खराब होऊ शकतो. फाउंडेशन लावताना चुकूनही या चुका करू नका.

Makeup Hacks : मेकअपमधली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फाउंडेशन, जे लावल्याने तुमच्या चेहऱ्यावरील फक्त डागच बऱ्याच अंशी लपत नाहीत तर यामुळे स्किन ईव्हन सुद्धा दिसते. तुमच्या स्किन टोननुसार तुम्ही बाजारातून कोणतेही फाउंडेशन खरेदी करू शकता. पण लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या स्किन टोनशी जुळणारे फाउंडेशन निवडावे लागेल, अन्यथा फाउंडेशन लावल्यानंतर तुमचा चेहरा काळसर दिसेल. आज आम्ही तुम्हाला मेकअपच्या अशा चुका सांगत आहोत, ज्या तुम्ही टाळल्या पाहिजेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

चेहरा धुवून कोरडे न करणेः नुसते वाइप शीटने चेहरा पुसून घाईघाईत कधीही काम करू नका. पण मेकअप करण्यापूर्वी चेहरा नेहमी फेसवॉशने धुवा. त्यानंतर चेहरा पूर्णपणे कोरडा करा.

मॉइश्चरायझर न लावणेः चेहरा योग्य प्रकारे हायड्रेट करणे खूप महत्वाचे आहे. अनेक मुलींची त्वचा ऑइली असते. त्यामुळे त्या चेहऱ्यावर थेट फाउंडेशन लावतात. पण असे केल्याने तुमचा मेकअप तर खराब होऊ शकतोच पण तुमची त्वचा जागोजागी पील झालेली दिसते.

घामावर क्रीम लावणेः मेकअप करताना तुम्हाला हवेशीर जागा शोधावी लागेल. जेणेकरून तुम्हाला उन्हाळ्यात घाम येऊ नये. जेव्हा तुम्हाला घाम येतो तेव्हा तुम्हाला तुमचा चेहरा पाण्याने स्वच्छ करावा लागतो. घामाच्या त्वचेवर चुकूनही क्रीम लावू नका.

जास्त फाउंडेशन लावणेः फाउंडेशन तुम्हाला चांगले कव्हरेज देते. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही पिंपलचा प्रत्येक डाग कव्हर करण्यासाठी भरपूर फाउंडेशन लावावे लागेल. यामुळे तुमचा चेहरा नैसर्गिक दिसणार नाही आणि मेकअप लवकर उतरण्याची शक्यताही वाढते.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या