मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Vomiting During Travel: प्रवासात उलट्या होतात? ‘या’ ३ गोष्टी तुमच्या बॅगेत नक्की ठेवा, मिळेल आराम

Vomiting During Travel: प्रवासात उलट्या होतात? ‘या’ ३ गोष्टी तुमच्या बॅगेत नक्की ठेवा, मिळेल आराम

Dec 03, 2022, 11:42 AM IST

    • Traveling Tips: अनेकदा काही लोकांना प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होतो आणि हे टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता.
प्रवास करताना उलटी समस्या (Freepik)

Traveling Tips: अनेकदा काही लोकांना प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होतो आणि हे टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता.

    • Traveling Tips: अनेकदा काही लोकांना प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास होतो आणि हे टाळण्यासाठी तुम्ही काही सोप्या उपायांचा अवलंब करू शकता.

Travel and health: अनेकदा तुम्ही पाहिले असेल की काही लोकांना प्रवासादरम्यान अचानक उलट्या होतात आणि त्यामुळे लोक प्रवास टाळतात. कारण कार, बस किंवा ट्रेनमधून प्रवास करताना काही लोकांच्या शरीराला वाहनाच्या वेगानुसार जुळवून घेता येत नाही. अशा स्थितीत हा प्रवास छान होण्याऐवजी वेदनादायी होतो. जर तुम्ही प्रवास करताना उलटीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या बॅगमध्ये ३ गोष्टी नक्कीच ठेवा ज्या खूप फायदेशीर ठरतील.

ट्रेंडिंग न्यूज

Pakora Recipe: क्रिस्पी लच्छा पकोडे बनवण्याची सोपी रेसिपी, संध्याकाळच्या चहाची मजा होईल डबल

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

आले देईल आराम

प्रवासादरम्यान ज्या व्यक्तीला उलट्या होत असतील त्यांनी आल्याचा वापर अवश्य करावा. कारण आले हे आयुर्वेदिक औषध आहे तसेच चहा किंवा भाज्यांची चव वाढवणारे आहे. जेव्हा जेव्हा एखाद्याला मळमळ किंवा उलट्या झाल्यासारखे वाटत असेल तेव्हा आल्याचे सेवन केले पाहिजे. म्हणूनच प्रवासादरम्यान तुम्ही तुमच्या पिशवीत कच्चे आले ठेवावे आणि जेव्हाही तुम्हाला उलट्या झाल्यासारखे वाटेल तेव्हा थोडेसे आले चावून खावे. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

लिंबू

प्रवासादरम्यान तुम्हाला उलटीच्या समस्येने त्रास होत असेल तर लिंबू देखील एक फायदेशीर उपाय आहे. कारण लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे, जे रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते. म्हणूनच प्रवासात लिंबू सोबत ठेवा आणि जेव्हा तुम्हाला मळमळ वाटेल तेव्हा लिंबू कापून चोखून घ्या. लिंबाचा रस चोखल्याने उलट्यांमध्ये आराम मिळेल.

तुळशीची पाने

चहा बनवताना त्यात तुळशीची पाने मिसळली तर त्याची चव उत्कृष्ट होते. तुळस अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे. उलट्या थांबवण्यासाठी हा रामबाण उपाय ठरू शकतो. प्रवासादरम्यान तुळशीची काही पाने सोबत ठेवा आणि जेव्हा तुम्हाला उलट्या झाल्यासारखे वाटेल तेव्हा ४-५ पाने चावा. तुम्हाला हवे असल्यास तुळशीच्या पानांचा रस एका बाटलीत काढून घ्या आणि उलट्या झाल्यासारखे वाटल्यावर त्यात मध मिसळून प्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

पुढील बातम्या