मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ayurveda Tips: ड्राय फ्रूट्स खाण्याचीही असते वेळ आणि पद्धत, जाणून घ्या कोणी खाणे टाळावे

Ayurveda Tips: ड्राय फ्रूट्स खाण्याचीही असते वेळ आणि पद्धत, जाणून घ्या कोणी खाणे टाळावे

May 22, 2023, 04:49 PM IST

    • Tips to Eat Dry Fruits: आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स खाणे हे फायदेशीर आहे. पण ते खाण्याची पद्धत, वेळ आणि प्रमाण चुकले तर मात्र त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. जाणून घ्या याच्याशी संबंधित गोष्टी.
ड्राय फ्रुट्स खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत

Tips to Eat Dry Fruits: आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स खाणे हे फायदेशीर आहे. पण ते खाण्याची पद्धत, वेळ आणि प्रमाण चुकले तर मात्र त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. जाणून घ्या याच्याशी संबंधित गोष्टी.

    • Tips to Eat Dry Fruits: आरोग्यासाठी ड्रायफ्रुट्स खाणे हे फायदेशीर आहे. पण ते खाण्याची पद्धत, वेळ आणि प्रमाण चुकले तर मात्र त्याचे साईड इफेक्ट होऊ शकतात. जाणून घ्या याच्याशी संबंधित गोष्टी.

Right Way, Quantity and Time to Eat Dry Fruits: ड्रायफ्रुट्समुळे शरीराला अनेक प्रकारचे फायदे मिळत असल्याने डॉक्टर्स रोज ते खाण्याचा सल्ला देतात. जर तुम्ही रोज ड्रायफ्रुट्स खात असाल तर तुम्ही आयुर्वेदाच्या काही नियमांचे पालन करणे देखील गरजेचे आहे. ड्रायफ्रुट्स मध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर, मॅग्नेशियम आणि राइबोफ्लेविन असते. तसेच यात लोह, पोटॅशियम, झिंक आणि व्हिटॅमिन बी, नियासिन, थायमिन आणि फॉलेट देखील चांगल्या प्रमाणात असते. याचा चांगला रिझल्ट हवा असेल तर ते खाण्याची योग्य वेळ, पद्धत आणि प्रमाण यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेद तज्ज्ञांनी याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहे. ते जाणून घेऊया.

ट्रेंडिंग न्यूज

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

Tamarind Benefits: केवळ जीभेचे चोचले पुरवत नाही, तर आरोग्यासाठीही लाभदायी आहेत चिंच! ‘असा’ करा वापर

PCOS Problem: मासिक पाळी नियमित आल्यानंतरही असून शकते पीसीओसची समस्या! जाणून घ्या काय आहेत लक्षणं

ड्रायफ्रुट्स खाण्याचे नियम

ड्रायफ्रुट्स मध्ये चांगल्या प्रमाणात हेल्दी फॅट, प्रोटीन आणि फायबर असते. आयुर्वेदानुसार हे बरेच हेवी असतात. त्यामुळे यांना पचवने थोडे कठीण असते. हे नट्स गरम असतात. त्यामुळे खाण्यापूर्वी साधारण ६ ते ८ तास यांना भिजवून ठेवा. भिजवल्यामुळे याच्यातील फायटिक अॅसिड, टॅनिन निघून जाते आणि त्यातील गरमी कमी होते. आणि त्यामुळे हे नट्स पचवणे सोपे होते. जर तुम्हाला भिजवून खायला आवडत नसतील तर तुम्ही ते ड्राय रोस्ट करून देखील खाऊ शकता.

ड्रायफ्रुट्स खाण्याची योग्य वेळ आणि प्रमाण

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते तुम्ही ड्रायफ्रुट्स सकाळी, दुपारी किंवा संध्याकळच्या नाश्त्यामध्ये खावू शकता. हे खालल्यामुळे भूक लागत नाही. तसेच जर तुम्ही रोज व्यायाम करता आणि तुम्हाला कुठलाही आजार नाहीये तर तुम्ही रोज एक मुठ भरून नट्स खाऊ शकता.

जास्त खालल्याने होणारे साइड इफेक्ट

ड्रायफ्रुट्स खाणे जसे आरोग्यासाठी चांगले आहेत, तसेच जर त्याचे प्रमाण जास्त झाले तर ते हानीकारक देखील ठरू शकते. ड्रायफ्रुट्स जास्त प्रमाणात खालल्यास त्याचे साईड इफेक्ट होतात. पाचन संबंधी समस्या उद्भवू शकते. तसेच ओटीपोटात जडपणा, गरमी, लूज मोशन, वजन वाढणे, भूख न लागणे यासारख्या समस्या होऊ शकतात.

या लोकांनी टाळावे

ड्रायफ्रुट्स सगळ्याच लोकांसाठी चांगले असते असे नाही. प्रत्येक व्यक्तीने शरीर हे वेगळे असते. त्यामुळे ते प्रत्येकाला समान रिझल्ट देतील असे नाही. ज्या लोकांना पचन समस्या, लूज मोशन, जीआरडी, आईबीएस, कोलाइटिस्, नट्सची एलर्जी यासारख्या समस्या असतील त्यांनी हे खाऊ नये.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

विभाग

पुढील बातम्या