मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Urvashi Rautela: आता ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादववर फिदा झालीये उर्वशी रौतेला! व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Urvashi Rautela: आता ‘बिग बॉस’ विजेत्या एल्विश यादववर फिदा झालीये उर्वशी रौतेला! व्हिडीओ शेअर करत म्हणाली...

Sep 10, 2023, 11:28 AM IST

  • Urvashi Rautela-Elvish Yadav: अभिनेत्री उर्वशी रौतेला एल्विश यादवसोबत 'हम तो दिवाने' नावाचा नवीन म्युझिक व्हिडीओ घेऊन येत आहे.

Elvish Yadav-Urvashi Rautela

Urvashi Rautela-Elvish Yadav: अभिनेत्री उर्वशी रौतेला एल्विश यादवसोबत 'हम तो दिवाने' नावाचा नवीन म्युझिक व्हिडीओ घेऊन येत आहे.

  • Urvashi Rautela-Elvish Yadav: अभिनेत्री उर्वशी रौतेला एल्विश यादवसोबत 'हम तो दिवाने' नावाचा नवीन म्युझिक व्हिडीओ घेऊन येत आहे.

Urvashi Rautela-Elvish Yadav: ‘बिग बॉस ओटीटी सीझन २’चा विजेता आणि सोशल मीडिया सेलिब्रिटी एल्विश यादव सध्या प्रचंड चर्चेत आहे. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर एल्विशला अनेक प्रोजेक्ट ऑफर केले जात आहेत आणि तो त्याच्या यशाचा खूप आनंद घेत आहे. अलीकडेच एल्विशने त्याच्या नवीन घराचा ब्लॉग शेअर केला आहे. त्याचवेळी आता अभिनेत्री उर्वशी रौतेला एल्विश यादवसोबत 'हम तो दिवाने' नावाचा नवीन म्युझिक व्हिडीओ घेऊन येत आहे. या गाण्यात एल्विश बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याचबरोबर उर्वशी देखील एल्विशसोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे.

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती गाण्याची तयारी करताना दिसली आहे. आता तिच्या या गाण्याचे पोस्टर रिलीज झाले आहे. हा व्हिडीओ शेअर करताना उर्वशीने लिहिले की, 'मी माझ्या हिरो एल्विशसाठी गाण्याचे बोल पाठ करत आहे.' एल्विशने उर्वशीचा हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टास्टोरीवर शेअर केला आहे.

Welcome To The Jungle: ब्रेकअपनंतर पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार अक्षय कुमार अन् रवीना टंडन!

याआधी देखील उर्वशी म्हणाली होती की, एल्विश यादवने 'हम तो दिवाने'मध्ये खरोखरच खूप छान काम केले आहे. आम्ही सगळेच त्याचं काम बघून आश्चर्यचकित झालो आहोत. माझ्या मते बॉलिवूडला एल्विशसारख्या हिरोची नितांत गरज आहे.’ यावर एल्विश यादव म्हणाला की, 'संपूर्ण शूटिंगदरम्यान माझे लक्ष फक्त तिच्यावर होते, कारण मला वाटतं की, जेव्हा केमिस्ट्री चांगली जमते तेव्हाच, ऑनस्क्रीन कपल चांगले दिसते. आता प्रेक्षकांनी आम्हाला त्यांचे प्रेम आणि आशीर्वाद द्यावेत.

काही दिवसांपूर्वी एल्विश आणि उर्वशी राजस्थानमध्ये एका गाण्याचे शूटिंग करत होते. शूटिंगदरम्यानचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये दोघांचा देसी लूक पाहायला मिळाला होता. या गाण्याचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे आणि म्युझिक व्हिडीओ लवकरच रिलीज होणार आहे. एल्विशचे चाहतेही या गाण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा म्युझिक व्हिडीओ १६ सप्टेंबरला रिलीज होणार आहे.

विभाग

पुढील बातम्या