मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tu Chal Pudha: अखेर अश्विनीला मिळाला पुढे जाण्याचा नवा मार्ग! काय असेल शिल्पीची नवी खेळी?

Tu Chal Pudha: अखेर अश्विनीला मिळाला पुढे जाण्याचा नवा मार्ग! काय असेल शिल्पीची नवी खेळी?

May 15, 2023, 06:35 PM IST

  • Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीला हरवण्यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. पण, ती नेहमीच तोंडघडशी पडली.

Tu Chal Pudha

Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीला हरवण्यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. पण, ती नेहमीच तोंडघडशी पडली.

  • Tu Chal Pudha Latest Episode: अश्विनीला हरवण्यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. पण, ती नेहमीच तोंडघडशी पडली.

Tu Chal Pudha Latest Episode:तू चाल पुढं’ या मालिकेत आता अश्विनीचा नवा प्रवास पाहायला मिळणार आहे. एकीकडे अश्विनी आपल्या दोन्ही मुली आणि पती श्रेयससोबत घरातून बाहेर पडली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी तिला अनेक हाल सोसावे लागले होते. चौघांनाही आपल्या गाडीत बसूनच रात्र काढावी लागली होती. मात्र, आता अश्विनीला राहण्याचा नवा ठिकाणा मिळाला आहे. प्रतिकने अश्विनी आणि तिच्या कुटुंबाची राहण्याची सोय केली आहे. त्याने स्वतःचे बंद असलेले एक घर अश्विनीला भाड्याने दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

या नव्या घरात आता अश्विनी आपला नवा संसार उभा करणार आहे. देवाची पूजा करण्यापासून तिने या नव्या प्रवासाची सुरुवात केली आहे. आता ती आपली ख्याली खुशाली कळवण्यासाठी वाघमारेंच्या घरी जाणार आहे. मात्र, शिल्पी तिला घरात पाऊल ठेवण्यापासून रोखणार आहे. शिल्पीच्या हट्टापुढे अश्विनी आणि श्रेयस दोघेही नमतं घेत घर सोडण्याचा निर्णय घेतला होता.

The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’च्या यशानंतर आता चित्रपटाचा सीक्वल येणार? मेकर्सची मोठी घोषणा!

आपल्या वादात घरातल्या लोकांना बेहाल होताना पाहणं अश्विनीला असहाय्य झालं होतं. अखेर तिने पती श्रेयस आणि आपल्या दोन्ही मुलींसह घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला. अश्विनीला हरवण्यासाठी शिल्पीने अनेक प्रयत्न केले. पण, ती नेहमीच तोंडघडशी पडली. अश्विनी विरोधात सगळेच डाव अयशस्वी ठरल्यानंतर आता शिल्पीने तिच्या कुटुंबावर वार करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणा अश्विनीला घरातून बाहेर काढलं. त्यामुळे आता ती रस्त्यावर आली, या विचाराने शिल्पी आनंदून गेली होती. मात्र, आता अश्विनीला राहण्यासाठी घर मिळालं हे ऐकून ती आणखीनच संतापली आहे.

आपण त्रास देऊन देखील आश्विनी पुन्हा पुन्हा स्वतःच्या पायावर उभी राहत आहे, हे बघून आता शिल्पी आणखीनच वैतागली आहे. आता अश्विनीला राहायला छान मोठं घर मिळालं आहे हे कळल्यानंतर शिल्पी तिला उद्ध्वस्त करण्यासाठी नवा डाव आखताना दिसणार आहे. अश्विनीला आई-बाबांना भेटण्यापासून देखील शिल्पी रोखणार आहे. यानंतर आता अश्विनी काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

विभाग

पुढील बातम्या