मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan On OTT: ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार ‘पठाण’! जाणून घ्या कधीपासून पाहता येणार...

Pathaan On OTT: ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवरही रिलीज होणार ‘पठाण’! जाणून घ्या कधीपासून पाहता येणार...

Jan 18, 2023, 01:04 PM IST

    • Pathaan On OTT: शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर देखील रिलीज करण्यात येणार आहे.
Pathaan

Pathaan On OTT: शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर देखील रिलीज करण्यात येणार आहे.

    • Pathaan On OTT: शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट थिएटरनंतर ओटीटीवर देखील रिलीज करण्यात येणार आहे.

Pathaan On OTT: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ सध्या प्रचंड चर्चेत आहे. जसजशी या चित्रपटाची रिलीज डेट जवळ येत आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढत आहे. प्रदर्शनाआधीच हा चित्रपट वादात सापडला असून, हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला पठाणच्या ओटीटी रिलीजसाठी काही बदल करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या चित्रपटाचे ओटीटी रिलीजचे अपडेट्सही समोर आले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

पठाण’ या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर ओटीटीवर देखील रिलीज करण्यात येणार आहे. २५ एप्रिल रोजी अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे. मात्र, ओटीटीवर रिलीज होण्यापूर्वी चित्रपटाला पुन्हा सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. म्हणजेच, हा चित्रपट २५ एप्रिलपासून ओटीटीवर दाखवला जाऊ शकतो. प्राईम व्हिडीओने त्याचे ओटीटी अधिकार १०० कोटींना विकत घेतल्याचे देखील म्हटले जात आहे. मात्र, अद्याप यांची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने यशराज फिल्म्सला शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटात काही बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने चित्रपटाला सबटायटल्स, क्लोज कॅप्शन आणि ऑडिओ डिस्क्रीप्शन यांचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत. दृष्टिहीन लोकांना देखील OTT प्लॅटफॉर्मवर या चित्रपटाचा आनंद घेता यावा, यासाठी हे बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बदल केल्यानंतर उच्च न्यायालयाने सीबीएफसीला पुन्हा प्रमाणपत्र घेण्यास देखील सांगितले आहे.

चार वर्षांनंतर आपल्या आवडत्या अभिनेत्याला पडद्यावर पाहण्यासाठी चाहते या चित्रपटाचे आगाऊ बुकिंगही करत आहेत. परदेशात ‘पठाण’ चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू झाली असून, २० जानेवारीपासून भारतातही सुरू होणार आहे. 'पठाण' हा चित्रपट २५ जानेवारीला भारतासह जगभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत.

पुढील बातम्या