मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan Trailer : मोठ्या ब्रेकनंतर किंग खानची धमाकेदार वापसी; ‘पठाण’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

Pathaan Trailer : मोठ्या ब्रेकनंतर किंग खानची धमाकेदार वापसी; ‘पठाण’चा जबरदस्त ट्रेलर पाहिलात का?

Jan 10, 2023, 01:24 PM IST

    • Pathaan Trailer Out: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Pathaan Trailer

Pathaan Trailer Out: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

    • Pathaan Trailer Out: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Pathaan Trailer Out: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘पठाण’चा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलरची चाहते अनेक दिवसांपासून वाट बघत होते. अखेर प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. 'पठाण' चित्रपटाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. काही काळापूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. या टीझरला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती. यामध्ये शाहरुखचा अॅक्शन अवतार पाहायला मिळाला.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

या आधी ‘पठाण’ चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे प्रदर्शित झाले होते. यात दीपिका पदुकोणने परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवर बराच गदारोळ झाला होता. आता शाहरुख खानच्या ‘पठाण’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये शाहरुखचे दमदार अॅक्शन सीन पाहायला मिळत आहेत. वयाच्या ५७व्या वर्षी शाहरुख खानने सिक्स पॅक अॅब्स बनवले आहेत. तर, दीपिका पदुकोण देखील खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका हातात बंदूक घेऊन स्टंट करताना दिसत आहे. तर, जॉन अब्राहम या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारताना दिसत आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रीलर चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

पुढील बातम्या