मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Sara Ali Khan: सारा अली खानला महादेवाच्या चरणी लीन पाहून संतापले लोक; ट्रोल करत म्हणाले...

Sara Ali Khan: सारा अली खानला महादेवाच्या चरणी लीन पाहून संतापले लोक; ट्रोल करत म्हणाले...

Feb 20, 2023, 06:47 PM IST

  • Sara Ali Khan At Shankar Mandir: देशभरात नुकतीच जल्लोषात महाशिवरात्र साजरी केली गेली. याच खास निमित्ताने सैफ अली खानची लेक सारा हिने देखील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

Sara Ali Khan

Sara Ali Khan At Shankar Mandir: देशभरात नुकतीच जल्लोषात महाशिवरात्र साजरी केली गेली. याच खास निमित्ताने सैफ अली खानची लेक सारा हिने देखील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

  • Sara Ali Khan At Shankar Mandir: देशभरात नुकतीच जल्लोषात महाशिवरात्र साजरी केली गेली. याच खास निमित्ताने सैफ अली खानची लेक सारा हिने देखील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.

Sara Ali Khan At Shankar Mandir: बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान तिच्या चित्रपटांमुळे आणि फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. मात्र, अनेकदा ती सोशल मीडियावर ट्रोल देखील होते. आता देखील सारासोबत असंच काहीसं घडलं आहे. देशभरात नुकतीच जल्लोषात महाशिवरात्र साजरी केली गेली. याच खास निमित्ताने सैफ अली खानची लेक सारा हिने देखील महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. याचा फोटो देखील तिने शेअर केला आणि चाहत्यांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, यानंतर अचानक साराला जोरदार ट्रोल करण्यात येऊ लागले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

अभिनेत्री सारा अली खान ही अमृता सिंह आणि सैफ अली खान यांची मुलगी आहे. सारा नेहमीच वेगवेगळ्या मंदिरात जात असते. इतकेच नव्हे, तर ती त्याचे फोटो देखील शेअर करत असते. आपल्या व्यस्त वेळापत्रकातूनही थोडा वेळ बाजूला काढून महाशिवरात्रीच्या दिवशी सारा अली खानने मंदिरात जाऊन भगवान शंकराचं दर्शन घेतलं. मात्र, यावेळी फोटो शेअर केल्यानंतर साराचे काही चाहते तिच्यावर नाराज झाले आहेत. साराची आई हिंदू तर, वडील मुस्लिम आहेत. म्हणूनच सारा दोन्ही धर्मांचे सण तितक्याच प्रेमाने साजरे करते. मात्र, तरीही आता चाहते तिला ट्रोल करत आहेत.

सारा अली खानने महादेवाच्या मंदिरातील फोटो शेअर करताच आता काही युझर्स तिला धर्मावरून ट्रोल करत आहेत. काहींनी तर साराला थेट इस्लाम धर्मातून बाहेर काढण्याची धमकी देखील दिली आहे. काहींनी तिला इस्लाम विसरलीस का? असा प्रश्न केला आहे. तिच्या या फोटोंवर युझर्स वेगवेगळ्या कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकीकडे काही युझर्स सारा अली खानला ट्रोल करत आहेत, तर यावेळी आपल्या आवडत्या अभिनेत्रीची बाजू घेण्यासाठी तिचे चाहते देखील पुढे सरसावले आहे. साराच्या चाहत्यांनी तिचं तोंडभरून कौतुक केलं आहे. ‘मंदिरात जाण्यामुळे सतत ट्रोल होत असताना देखील सारा पुन्हा मंदिरात जाते आणि सगळ्या धर्मांना समान मानते’, असे म्हणत चाहते तिचे कौतुक करत आहेत.

विभाग

पुढील बातम्या