मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mrunal Thakur Dating: मृणाल ठाकूरला डेट करतोय बादशाह? स्वत: प्रतिक्रिया देत म्हणाला…

Mrunal Thakur Dating: मृणाल ठाकूरला डेट करतोय बादशाह? स्वत: प्रतिक्रिया देत म्हणाला…

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 14, 2023, 10:13 AM IST

    • Badshah and Mrunal Thakur Dating: सध्या सोशल मीडियावर बादशाह आणि मृणाल ठाकूरचा एका दिवाळी पार्टीमधील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.
Badshah and Mrunal Thakur Dating

Badshah and Mrunal Thakur Dating: सध्या सोशल मीडियावर बादशाह आणि मृणाल ठाकूरचा एका दिवाळी पार्टीमधील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

    • Badshah and Mrunal Thakur Dating: सध्या सोशल मीडियावर बादशाह आणि मृणाल ठाकूरचा एका दिवाळी पार्टीमधील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवरुन त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. या चर्चा बादशाहचा अभिनेत्री मृणाल ठाकूरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे रंगल्या आहेत. हा फोटो एका दिवाळी पार्टीमधील आहे. आता बादशाहने यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘प्यार जिंदगी है’ पुस्तकासाठी लेखिका अनिता पाध्ये यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार

काजूला सोहमच्या खोलीत पाहून कलाला बसला धक्का, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेत आज काय घडणार?

'इसको बोलते है....', बिग बॉस मराठीमध्ये महेश मांजरेकरांची जागा रितेशने घेताच शेवंताने केली कमेंट

Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

सध्या संपूर्ण देशात मोठ्या धूमधडाक्यात दिवाळी साजरी होताना दिसत आहे. सर्वसामान्यांपासून ते दिग्गजांपर्यंत सर्वजण मोठ्या आनंदाने दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. अनेक कलाकारांच्या घरी दिवाळी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले. अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी आजोजित केलेल्या पार्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिने पार्टीला अनेक कलाकारांना बोलावले होते. दरम्यान अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि बादशाहचा एकत्र फोटो पाहून सर्वांना धक्का बसला आहे. ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आता बदशाहने यावर प्रतिक्रिया दिली आहे.
वाचा: करीनाच्या मनात आजही अमिषाविषयी द्वोष, 'त्या' सिनेमामुळे झाले होते भांडण

बादशाहने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. 'प्रिय इंटरनेट, तुम्हाला पुन्हा एकदा निराश करण्यासाठी मनापासून माफी मागतो. तुम्ही जसा विचार करत आहात तसे काही नाही' या आशयाची पोस्ट बादशाहने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर केली आहे.

Badshah post

११ नोव्हेंबर २०२३ रोजी शिल्पा शेट्टीने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना बोलावण्यात आले होते. दरम्यान, अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि बादशाह यांचा या पार्टीमधील एक फोटो व्हायरल झाला. या फोटोमध्ये दोघेही एकत्र पार्टीमधून बाहेर निघताना दिसत होते. तसेच मृणालने बादशाहचा हात पकडल्याचे देखील दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

मृणालच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती नुकताच 'पिप्पा' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली. तिच्यासोबत या चित्रपटात अभिनेता ईशान खट्टर दिसला होता. तर दुसरीकडे बादशाह एमटीव्ही वाहिनीवरील 'हसल ३.०' या शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे.

पुढील बातम्या