Koffee with karan 8 Update: करीनाच्या मनात आजही अमिषाविषयी द्वोष, 'त्या' सिनेमामुळे झाले होते भांडण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Koffee with karan 8 Update: करीनाच्या मनात आजही अमिषाविषयी द्वोष, 'त्या' सिनेमामुळे झाले होते भांडण

Koffee with karan 8 Update: करीनाच्या मनात आजही अमिषाविषयी द्वोष, 'त्या' सिनेमामुळे झाले होते भांडण

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Nov 13, 2023 01:45 PM IST

Kareena Kapoor And Amisha Patel fight: करीनाला कॉफी विथ करण या शोमध्ये नुकताच करणने अमिषा पटेल विषयी प्रश्न विचारला. त्यावर तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले.

Koffee with karan 8
Koffee with karan 8

सध्या सर्वत्र बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता 'करण जोहरचा कॉफी विथ करण' हा शो चर्चेत आहे. या शोच्या आठव्या सिझनमध्ये सहभागी होणारे कलाकार हे प्रेक्षकांचे लक्ष वेधताना दिसत आहेत. आता या शोच्या आगामी भागामध्ये अभिनेत्री करीना कपूर खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट एकत्र हजेरी लावताना दिसणार आहेत. सोशल मीडियावर या भागाचा प्रोमो व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये करीना अमिषा पटेलविषयी बोलताना दिसत आहे.

काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर कॉफी विथ करण सिझन ८च्या आगामी भागाचा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर करीना कपूरला प्रश्न विचारतो की, 'गदर 2'च्या सक्सेस पार्टीला तू का गेली नाहीस? कारण अमिषा आणि तुझ्यात भांडण झाले आहे. तुला कहो ना प्यार है सिनेमा करायचा होता आणि अमिषाला तो ऑफर करण्यात आला.' त्यावर करीनाने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 'मी सध्या तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे' असे करीना म्हणाली.
वाचा: विद्याला किस करताना घाबरला होता इम्रान हाश्मी, जाणून घ्या काय नेमकं काय झालं

सध्या सोशल मीडियावर करीना आणि करणचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत 'आगामी भागाची आम्ही आतुरतेने वाट पाहात आहोत' असे म्हटले आहे.

कॉपी विथ करण ८च्या आगामी भागाच आलिया आणि करीना मजामस्ती करताना दिसणार आहे. व्हिडीओच्या सुरुवातीलाच आलिया म्हणते की 'कॉन्ट्रोव्हर्शियल कॉफी विथ करण.' त्यानंतर करण जोहर आलिया भट्ट आणि करीना कपूरला विचारत आहे की कोण कोणाची भावजय आणि कोण कोणाची नणंद? यावर करीना कपूर हसत म्हणाली की, मी कोणाची वहिनी नाही. याशिवाय आलिया भट्ट आणि करीना कपूर देखील व्हिडिओमध्ये त्यांच्या गो-टू डान्स मूव्ह्ज दाखवताना दिसत आहे.

Whats_app_banner