logo
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

Aarti Vilas Borade HT Marathi

May 21, 2024, 03:09 PM IST

    • Gui Gadkari: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जुई गडकरीही आजारी आहे. आता एका चाहतीने केलेल्या कमेंटला तिने उत्तर दिले आहे.
Gui Gadkari: जुई गडकरी अजूनही आजारी

Gui Gadkari: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जुई गडकरीही आजारी आहे. आता एका चाहतीने केलेल्या कमेंटला तिने उत्तर दिले आहे.

    • Gui Gadkari: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री जुई गडकरीही आजारी आहे. आता एका चाहतीने केलेल्या कमेंटला तिने उत्तर दिले आहे.

टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावणारी सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे 'ठरलं तर मग.' या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी महत्त्वाची भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेतून जुईने बऱ्याच वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. पण जुईची प्रकृती ही गेल्या काही महिन्यांपासून ठीक नसल्याचे समोर आले होते. अद्याप जुईची प्रकृती ठीक नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bai Ga Teaser: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत

Sukh Kalale: माधवने मिथिलाला दिले खास वचन, 'सुख कळले' मालिकेत वटपौर्णिमा विशेष भाग

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

Anupam Kher: अनुपम खेर यांच्या ऑफिसमध्ये चोरी, पैसे आणि चित्रपटाचे नेगेटिव्ह चोरीला

जुई गडकरी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या आयुष्यात काय सुरु आहे हे ती सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतत सांगताना दिसत असते. कधी ती बाहेर फिरायला गेल्यावर फोटो शेअर करते तर कधी चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. नुकताच जुईने एका चाहतीच्या कमेंटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तब्बेत ठीक नसल्याची कबूली दिली आहे.
वाचा: आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

काय म्हणाली चाहती?

नुकताच 'ठरलं तर मग' या मालिकेचा महाएपिसोड झाला. या एपिसोडचे अनेकांनी कौतुक केले. एका चाहतीने या एपिसोडमधील जुईच्या अभिनयाचे कौतुक केले होते. 'महा एपिसोड बघताना मला एक गोष्ट जाणवली की तुझी तब्बेत अजून बरी वाटत नाहीये. तरीही आपल्या चेहऱ्यावर आजारी असल्याची जराही भावना न आणता इतका छान सीन दिला के खूपच कौतुक करण्यासारखे आहे. तू जी मेहनक घेत आहे आणि काम करत आहे, तुझे हावभाव आणि भावना इतक्या छान होत्या की आम्ही खऱ्या आयुष्यात हे सगळं अनुभवत आहोत असे वाटले. त्यामुळेच ठरलं तर मग ही मालिका घरोघरी आपली म्हणून पाहिली जाते. फक्त एकच स्वत:ची काळजी घेत जा. काळजी घे' असे चाहती म्हणाली आहे.
वाचा: मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

जुई गडकरी कमेंट

काय म्हणाली जुई गडकरी?

जुई गडकरीने या चाहतीच्या मेसेजचा स्क्रीनशॉट तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने 'तुमचे खूप चांगले निरिक्षण आहे' असे म्हटले आहे.
वाचा: कार्तिकला बारशाचे आमंत्रण देऊन इंद्राने केला घोळ, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत पहिल्यांदाच मुक्ताने सुनावले सावनीला

आजारपणामुळे घेतला होता इंडस्ट्रीतून ब्रेक

काही वर्षांपूर्वी जुई गडकरी मोठ्या आजाराशी झुंज देत होती. त्यामुळे तिने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. जवळपास ५ ते ६ वर्षे जुई इंडस्ट्रीपासून लांब होती. तिची स्टार प्रवाह वाहिनीवर पुढचं पाऊल ही त्यावेळी लोकप्रिय ठरलेली मालिका होती. पहिल्याच मालिकेने जुईला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले होते. २०१७ नंतर आता जुई पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पोहोचली आहे. चाहते देखील तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे दिसत आहे.

पुढील बातम्या