मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: दीपाला पुन्हा एकदा मिळणार सासू सौंदर्याची साथ! कार्तिकीला शोधू शकणार?

Rang Maza Vegla: दीपाला पुन्हा एकदा मिळणार सासू सौंदर्याची साथ! कार्तिकीला शोधू शकणार?

Aug 16, 2023, 05:54 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Update: एकीकडे कार्तिकी इनामदार हिला किडनॅप करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे तिची आई दीपा आपल्या मुलीला शोधण्यासाठी अगदी प्राण पणाला लावून तिला शोधत आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update: एकीकडे कार्तिकी इनामदार हिला किडनॅप करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे तिची आई दीपा आपल्या मुलीला शोधण्यासाठी अगदी प्राण पणाला लावून तिला शोधत आहे.

  • Rang Maza Vegla Latest Update: एकीकडे कार्तिकी इनामदार हिला किडनॅप करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे तिची आई दीपा आपल्या मुलीला शोधण्यासाठी अगदी प्राण पणाला लावून तिला शोधत आहे.

Rang Maza Vegla Latest Update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत एकीकडे कार्तिकी इनामदार हिला किडनॅप करण्यात आलं आहे. तर, दुसरीकडे तिची आई दीपा आपल्या मुलीला शोधण्यासाठी अगदी प्राण पणाला लावून काम करत आहे. कार्तिकीला शोधून आणेनच, असा पक्का निर्धार दीपाने केला आहे. यामुळे ती अगदी समोर दिसेल तो मार्ग स्वीकारून आपला निश्चय पूर्ण करणार आहे. यात दीपाला तिची सासू सौंदर्या इनामदार हिची साथ मिळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

कार्तिकशी दुरावा निर्माण केल्याचं नाटक करत असताना, ते खरं वाटल्याने सौंदर्या इनामदार हिने दीपाशी बोलणं टाकलं होतं. मात्र, आता सौंदर्या इनामदार दीपाची साथ देताना दिसणार आहे. कार्तिकीला शोधण्यासाठी दीपाला सौंदर्या देखील मदत करणार आहे. आता सौंदर्याची साथ मिळाल्यानंतर दीपा एक नवी योजना आखून कार्तिकीला शोधण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, कार्तिकीला ज्या व्यक्तीने किडनॅप केले आहे, ती घरातच आहे.

KBC 15: ‘केबीसी १५’मध्ये स्पर्धक धीमयीने अमिताभ बच्चन यांनाच केला महत्त्वाचा प्रश्न! म्हणाली ‘तुम्ही रात्री...’

श्वेतानेच कार्तिकीला किडनॅप केले आहे. त्यामुळे आपल्याला जर खोलीत कुणी शोधायला आलं तर, मी झोपले आहे असं सांगायचं, अशी सूचना तिने सगळ्यांना दिली होती. मात्र, आता ती घरात नसल्याचं श्वेताला कळणार आहे. तर आता श्वेता देखील तिचा नवा प्लान तयार करणार आहे.

सध्या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुलींच्या वर्णाची तुलना करून दीपावर गंभीर आरोप केले जात आहे. कार्तिकी तुमच्यासारखी दिसत नाही, म्हणून तुम्ही तिच्यावर फारसं प्रेम केलं नाही आणि तिला वाईट वागणूक दिलीत, असे आरोप तिच्यावर करण्यात आले. मात्र, आपण आपल्या दोन्ही मुलींवर समान प्रेम करतो आणि त्यांना कधीच अंतर दिलं नाही, असं दीपा म्हणते. येत्या चार दिवसांत मी माझ्या मुलीला शोधून आणेन असा निर्धार दीपाने केला आहे. आता दीपा-सौंदर्या मिळून कार्तिकीला शोधू शकतील का, हे लवकरच कळणार आहे. मालिकेच्या येत्या भागांत अतिशय रंजक वळण पाहायला मिळणार आहे.

पुढील बातम्या