KBC 15 Latest Update: अभिनेते अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय टीव्ही शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १५वा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर अमिताभ बच्चन यांची जादू दिसली आहे. या शोमध्ये नेहमीच अमिताभ बच्चन स्पर्धकांसोबत गप्पा मारताना दिसतात. या शोमध्ये नेहमीच खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळते. आता या शोच्या नुकत्याच प्रसारित झालेल्या भागामध्ये गुजरातमधून धीमही त्रिवेदी सहभागी झाली होती. यावेळी धीमयी हिनेच अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारून त्यांची शाळा घेतली.
या खेळादरम्यान धीमहीने अमिताभ बच्चन यांना विचारले की, ते चित्रपट करतात आता केबीसीही सुरू झाले आहे आणि अशा परिस्थितीत सोशल मीडिया कसे मॅनेज करता? यावर उत्तर देताना अमिताभ बच्चन म्हणाले, 'तू सोशल मीडियावर आहेस का?' यावर धिमाही म्हणते की, ती अमिताभ बच्चन यांना इंस्टाग्रामवर फॉलो करते. यानंतर ती म्हणते, 'मी पाहिलं आहे की, तुम्ही रात्री दोन वाजता पण सोशल मीडियावर पोस्ट करता.' यावर गंमतीने अमिताभ बच्चन यांनी विचारलं की, मी काही चुकीचं करत आहे का?
यावर धीमही अमिताभ बच्चन यांना सल्ला देताना म्हणाली की, रात्री फोन वापरला तर डोळ्यांखाली काळी वर्तुळं येतात आणि जर तुम्हाला सुंदर दिसायचं असेल तर ८ तास झोप घ्यावीच लागेल. यावर अमिताभ म्हणतात की, 'मी चाहत्यांसाठी वेळ काढतो. मी ब्लॉग लिहितो. तो जर नाही लिहिला तर, माझे फॉलोअर शिव्या घालतात. अनेकदा असंही होतं की, मी लिहितो आणि पोस्ट बटणं दाबणं विसरून जातो.’
सोशल मीडियाविषयी बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, ‘सोशल मीडिया हे असे ठिकाण आहे की, जिथे लोकांशी संपर्क होतो, दोन चांगल्या गोष्टी घडतात, कधी वाईट गोष्टीही ऐकून घ्याव्या लागतात. आयुष्यात चांगल्या गोष्टीही असतात आणि वाईटही असतात. जर तुम्हाला कुणी म्हणत असेल की हे काम करू नका, तुमच्याने होणार नाही, तर त्याचे आव्हान स्वीकारा आणि ती गोष्ट घडवून दाखवा.’
संबंधित बातम्या