मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ranbir Kapoor: चिमुकल्या 'राहा'ला पाहून नेटकऱ्यांना आली कपूर घराण्यातल्या 'या' व्यक्तीची आठवण!

Ranbir Kapoor: चिमुकल्या 'राहा'ला पाहून नेटकऱ्यांना आली कपूर घराण्यातल्या 'या' व्यक्तीची आठवण!

Dec 26, 2023, 08:51 AM IST

  • Ranbir Kapoor Alia Bhatt Daughter Raha: ख्रिसमस ब्रंचच्या खास निमित्ताने रणबीर-आलियाने चाहत्यांना सरप्राईज देत आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

Ranbir Kapoor Alia Bhatt Daughter Raha

Ranbir Kapoor Alia Bhatt Daughter Raha: ख्रिसमस ब्रंचच्या खास निमित्ताने रणबीर-आलियाने चाहत्यांना सरप्राईज देत आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

  • Ranbir Kapoor Alia Bhatt Daughter Raha: ख्रिसमस ब्रंचच्या खास निमित्ताने रणबीर-आलियाने चाहत्यांना सरप्राईज देत आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे.

Ranbir Kapoor Alia Bhatt Daughter Raha: बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांची मुलगी राहा कपूर ही नुकतीच १ वर्षांची झाली आहे. मात्र, दोघांनीही आपल्या मुलीला मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून बराच काळ दूर ठेवले होते. मात्र, आता राहाच्या दुसऱ्या ख्रिसमस ब्रंचच्या खास निमित्ताने रणबीर-आलियाने चाहत्यांना सरप्राईज देत आपल्या मुलीचा चेहरा दाखवला आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीसोबत पापाराझींना फोटो पोज दिल्या. यावेळी राहाचा चेहरा बघून नेटकऱ्यांना राज कपूर यांची आठवण आली आहे. अनेकांनी राहा राज कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे म्हटले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या घरी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चिमुकल्या परीचे आगमन झाले होते. मात्र, त्यांनी आपल्या मुलीला मीडियापासून नेहमीच दूर ठेवले होते. त्यांच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. या दोघांनीही अनेकदा अनेक कार्यक्रमांमध्ये आपल्या मुलीचा राहाचा उल्लेख केला होता. तर, यामुळेच चाहते आणखी आतुर झाले होते. आलिया भट्टने आधीच म्हटले होते की, योग्य वेळ आल्यावर ती आपल्या मुलीची मीडिया आणि जगासमोर नक्कीच ओळख करून देईल. आता ती वेळ ख्रिसमसच्या निमित्ताने आली आहे. रणबीर आणि आलियाने पहिल्यांदाच आपल्या मुलीचा चेहरा रिव्हील करत, तिच्यासोबत फोटो पोज दिल्या आहेत.

Salaar Box Office Collection: 'सालार'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! अवघ्या ५ दिवसांत कमावले 'इतके' कोटी!

दरवर्षीप्रमाणे २५ डिसेंबरला आलिया भट्ट आणि रणबीर कपूर ख्रिसमस ब्रंचसाठी कपूर हाऊसमध्ये हजर झाले होते. यादरम्यान, ते दोघेही मुलगी राहासोबत दिसले. राहासोबतच्या रणबीर आणि आलियाच्या ख्रिसमस पार्टीचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. गुलाबी स्कर्ट आणि पांढऱ्या टॉपसह दोन बोमध्ये राहा खूपच क्युट दिसत आहे. तिला पापा रणबीर कपूरने उचलून घेतले होते. तर, आई आलिया तिच्यासोबत फोटो पोज देताना दिसली.

रणबीर कपूर आणि आलिया भट्टसोबत राहा पहिल्यांदाच दिसल्याबरोबर सोशल मीडियावर तिची हवा सुरू झाली आहे. कपूर कुटुंबातील ही छोटी परी कुणावर गेली आहे? कुणासारखी दिसते? असे प्रश्न नेटकऱ्यांना पडले आणि त्याची उत्तरं देखील त्यांनीच दिली आहे. रणबीर आणि आलियाची 'राहा' ही राज कपूर आणि ऋषी कपूर यांच्यासारखी दिसत असल्याचे चाहते म्हणत आहेत.

पुढील बातम्या