Swanandi Tikekar Wedding: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री आणि सूत्रसंचालिका स्वानंदी टिकेकर नुकतीच लग्न बंधनात अडकली आहे. गायक आशिष कुलकर्णी याच्या सोबत तिने लग्नगाठ बांधली आहे. नुकतेच तिने काही फोटो शेअर करून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 'आयुष्यभराची आनंदी साथ' असे म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत. स्वानंदी टिकेकर हि अभिनेते उदय टिकेकर आणि गायिका आरती अंकलीकर यांची मुलगी आहे. स्वानंदीने आता लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना आपल्या लग्नाची झलक दाखवली आहे.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर आणि 'इंडियन आयडॉल' फेम गायक आशिष कुलकर्णी यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर आता चाहत्यांनी या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत दोघांना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वानंदीने तिच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. अभिनेत्रींच्या या फोटोंनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर अनेक फोटो शेअर करून तिने वेळोवेळी आपल्या लग्नाच्या अपडेट्स चाहत्यांना दिल्या होत्या.
'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय टीव्ही मालिकेतून स्वानंदी महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचली होती. यानंतर तिने काही मालिकांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. तर, एका शोचं सूत्रसंचालन देखील तिने केलं होतं. अभिनेत्री असण्यासोबतच स्वानंदी खूप छान गाते. आशिष देखील गायक असल्याने दोघांचे सूर गाण्यामुळेच जुळले. आशिष कुलकर्णी याने 'इंडियन आयडॉल १२'मध्ये आपल्या आवाजाची जादू दाखवली होती. या शोचा तो विजेता ठरला नसला, तरी त्याने प्रेक्षकांच्या मनावर अमीट छाप सोडली होती.
अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने आपल्या आयुष्यातील ही सगळ्यात आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावेळी स्वानंदीने स्वतःचा आणि आशिष कुलकर्णी याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या लग्नाची झलक दाखवली आहे.
संबंधित बातम्या