मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pathaan: ‘पठाण’च्या रिलीज आधीच मोठा गदारोळ; विश्व हिंदू परिषदेने फाडले चित्रपटाचे पोस्टर

Pathaan: ‘पठाण’च्या रिलीज आधीच मोठा गदारोळ; विश्व हिंदू परिषदेने फाडले चित्रपटाचे पोस्टर

Jan 23, 2023, 08:03 AM IST

    • Pathaan Controversy : विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांच्या नेत्यांनी २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Pathaan

Pathaan Controversy : विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांच्या नेत्यांनी २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

    • Pathaan Controversy : विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांच्या नेत्यांनी २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

Pathaan Controversy : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या 'पठाण' चित्रपटाबाबतचे वाद थांबतच नाहीयेत. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुजरातमधील सुरत शहरातील एका सिनेमागृहात घुसून 'पठाण' चित्रपटाचे पोस्टर फाडले. एका पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले की, हा गदारोळ माजवल्याप्रकरणी पाच विहिंप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका पदुकोण भगव्या बिकिनीमध्ये दाखवल्यामुळे शाहरुख खानच्या या चित्रपटाला विरोध होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

विश्व हिंदू परिषदेसह विविध संघटनांच्या नेत्यांनी २५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तर, ही पोस्टर फाडण्याची घटना सुरतच्या रांदेर भागातील रुपाली थिएटरमध्ये शनिवारी सायंकाळी घडली. पोलिस निरीक्षक ए.एस. सोनारा यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, ‘रुपाली सिनेमागृहात काही लोक 'पठाण' चित्रपटाचे पोस्टर फाडत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यापैकी पाच जणांना आम्ही अटक केली आहे. त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व लोक विहिंपचे कार्यकर्ते आहेत.’

आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली बेकायदेशीर एकत्र येणे, हेतुपुरस्सर अपमान करणे आणि धमकी देणे या आरोपांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नुकतीच गुजरातमधील मल्टिप्लेक्स मालकांनी गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांची भेट घेतली होती. यावर हर्ष संघवी यांनी चित्रपटगृहांना समाजकंटकांच्या विरोधा दरम्यान पोलीस संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारीला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’ हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगु भाषेतही प्रदर्शित होणार आहे. ‘पठाण’ हा या वर्षातील बहुप्रतिक्षित आणि २०२३मधील पहिला मोठा चित्रपट आहे.

पुढील बातम्या