मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Naal 2: प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडायला नागराज मंजुळे पुन्हा सज्ज; चाहत्यांना दिली खास गुडन्यूज! पाहा व्हिडीओ...

Naal 2: प्रेक्षकांशी ‘नाळ’ जोडायला नागराज मंजुळे पुन्हा सज्ज; चाहत्यांना दिली खास गुडन्यूज! पाहा व्हिडीओ...

Oct 07, 2023, 11:53 AM IST

  • Naal 2 Official teaser Out: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘नाळ २’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

Naal 2 Official teaser

Naal 2 Official teaser Out: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘नाळ २’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

  • Naal 2 Official teaser Out: दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘नाळ २’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे.

Naal 2 Official teaser Out: ‘ए आई मी खेळाले जाऊ का?’ असं म्हणत आपल्या निरागस चेहऱ्याने आणि गोंडस अभिनयाने अवघ्या प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घालणारा ‘चैत्या’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लेखक-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी त्यांच्या बहुप्रतीक्षित ‘नाळ २’ या चित्रपटाचा अधिकृत टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. नागराज मंजुळे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर ‘नाळ २’चा हा टीझर शेअर करून चाहत्यांना आणि प्रेक्षकांना छान सरप्राईज दिलं आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत प्रेक्षकांना ‘नाळ २’ या चित्रपटाची नवी झलक दाखवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अप्पी आणि अर्जुनवर का वैतागले प्रेक्षक? थेट मालिकाच संपवायला म्हणतायत...

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

नागराज मंजुळे यांनी गेल्या वर्षीच ‘नाळ २’ या चित्रपटाची घोषणा केली होती. सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत त्यांनी या चित्रपटाची घोषणा केली होती. बरोबर एका वर्षानंतर त्यांनी या चित्रपटाचा टीझर रिलीज करून सगळ्यांनाच एक सुखद धक्का दिला आहे. या टीझरमध्ये आता प्रेक्षकांना मोठ्या चैत्यनसह एक सुंदर निसर्गरम्य परिसर देखील पाहायला मिळाला आहे. ‘मी माझ्या खऱ्या आईकडे चाललो’, असं म्हणून निघून गेलेला चैतन्य आता खरंच त्याच्या आईकडे पोहोचला आहे की, आणखी कुठे हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ‘नाळ २’ या चित्रपटाचा टीझर अतिशय सुरेख आहे. टीझर पाहून आता प्रेक्षकांची आतुरता आणखी वाढली आहे.

Tharala Tar Mag 7th Oct: प्रतिमा आणि रविराज येणार का एकमेकांच्या समोर? ‘ठरलं तर मग’मध्ये रंजक वळण!

‘नाळ २’ या चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांना आधी ‘नाळ’ची पार्श्वभूमी दाखवतो. लहानगा चैतन्य आपल्या बालमैत्रीणीला निरोप द्यायला आला आहे. मी माझ्या खऱ्या आईकडे चाललो, आता परत कधीच येणार नाही, असं म्हणून तो पुढच्या प्रवासाला निघालेला दिसला आहे. तर, दुसऱ्या दृश्यामध्ये निसर्गरम्य घाटांमधून पावसाळी वातावरणात एसटी महामंडळाची ‘लालपरी’ जाताना दिसली आहे. तर, त्यातून एक लहानगा हात पाऊस झेलण्यासाठी बाहेर आला आहे. तर, मागून आईचा हात आपल्या पिलाला पावसापासून वाचवण्यासाठी पुढे आला आहे. याच दृश्यात चैत्याची झलक दिसली आहे.

‘नाळ २’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करून या चित्रपटाची रिलीज डेट देखील आता जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर म्हणजे १० नोव्हेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘नाळ २’मधून पुन्हा एकदा ‘चैत्या’ म्हणजेच श्रीनिवास पोफळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.

विभाग

पुढील बातम्या