मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Madhuri Dixit: लोकसभा निवडणूक लढणार का? माधुरी दीक्षित हसून म्हणाली...

Madhuri Dixit: लोकसभा निवडणूक लढणार का? माधुरी दीक्षित हसून म्हणाली...

Dec 27, 2023, 06:44 PM IST

  • Madhuri Dixit Lok Sabha Elections: अभिनेत्री माधुरी दीक्षित येणारी लोकसभा निवडणूक लढवणार असून, राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले जात होते.

Madhuri Dixit first reaction on Lok Sabha Elections

Madhuri Dixit Lok Sabha Elections: अभिनेत्री माधुरी दीक्षित येणारी लोकसभा निवडणूक लढवणार असून, राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले जात होते.

  • Madhuri Dixit Lok Sabha Elections: अभिनेत्री माधुरी दीक्षित येणारी लोकसभा निवडणूक लढवणार असून, राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले जात होते.

Madhuri Dixit Lok Sabha Elections: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित लवकरच एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यावेळी ती निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला 'पंचक' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सध्या माधुरी दीक्षित खूप चर्चेत आहे. या दरम्यान अशीही चर्चा सुरू होती की, अभिनेत्री माधुरी दीक्षित येणारी लोकसभा निवडणूक लढवणार असून, राजकारणाच्या रिंगणात उतरणार असल्याचे म्हटले जात होते. यावर आता स्वतः माधुरी दीक्षित हिनेच उत्तर दिले आहे. नुकत्याच एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत माधुरी दीक्षित हिने निवडणूक लढवण्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

'पंचक' या हटके विषयावरील चित्रपटामुळे सध्या माधुरी दीक्षित चांगलीच चर्चेत आली आहे. या निमित्ताने तिने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिला आगामी निवडणूक लढवणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना माधुरी दीक्षित हसली आणि म्हणाली की, 'नाही, मी कोणतीही निवडणूक लढवणार नाहीये. राजकारण हे माझं पॅशन नाही. मी एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहे. मी सध्या जे करत आहे त्यात खूप आनंदी आहे. राजकारणात येण्याचा माझा कोणताही विचार नाही.' माधुरी दीक्षितच्या या उत्तरामुळे आता सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

भाजप नेते अमित शाह मुंबईच्या दौऱ्यावर आले, तेव्हापासून माधुरी दीक्षित निवडणूक रिंगणात उतरेल, अशी चर्चा रंगली होती. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्या दरम्यान अभिनेत्री माधुरी दीक्षित हिची भेट घेतली होती. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाकडून काही नावे चर्चेत आली होती. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नावाची चर्चा झाली होती. माधुरी दक्षिण मुंबईतून निवडणूक लढणार असल्याचे म्हटले जात होते. इतकंच नाही तर, पुण्यातील एका जागेवरही माधुरीच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, आता माधुरी दीक्षित हिने स्वतः या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

विभाग

पुढील बातम्या