Madhuri Dixit Husband Viral Video: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या तिच्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. माधुरी दीक्षित हिने आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने तिच्या पती डॉ.श्रीराम नेने यांच्यासोबत हजेरी लावली होती. या माधुरी दीक्षितच्या पतीचाही वेगळा अंदाज पाहायला मिळाला आहे. यावेळी सगळ्यांना त्यांचं मराठी देखील ऐकायला मिळालं. श्रीराम नेने हे मराठी असले, तरी त्यांचं बालपण मात्र परदेशात गेलं. त्यामुळे त्यांच्या बोलीभाषेवर देखील त्याचा प्रभाव आहे.
अभिनेत्री माधुरी दीक्षित सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. आतापर्यंत आपण तिला अभिनेत्री म्हणून बघितलंच आहे. मात्र, आत ती निर्माती म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माधुरी दीक्षित हिने तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांच्यासह मिळून ‘पंचक’ या नव्याकोऱ्या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या भव्य दिव्य ट्रेलर लॉंच सोहळयाला माधुरी दीक्षितने पती डॉ. श्रीराम नेने यांनीही हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी मराठीत संवाद साधला.
या चित्रपटाच्या ट्रेलर लॉंचिंग सोहळ्याला माधुरीसह तिचे पती डॉ. नेने देखील माध्यमांशी संवाद साधताना दिसले. माधुरी दीक्षित अनेकदा सगळ्यांशी मराठीतच बोलताना दिसते. पण, माधुरीच्या पतीला मराठीमध्ये बोलताना कुणीही फारसं ऐकलेलं नाही. या दरम्यान आता डॉ. नेने यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ते मराठीत बोलताना दिसले आहेत. यावेळी त्यांनी त्यांच्या आगामी ‘पंचक’ या चित्रपटाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. डॉ. श्रीराम नेने म्हणाले की, ‘माझं मराठी यांच्यासारखं नाही, पण या चित्रपटातील विनोद कथानक एका वेगळ्याच उंचीवर नेणारे आहे आणि हा चित्रपट सगळ्याच नात्यातील बंध उलगडून दाखवणारा आहे.’
डॉ. श्रीराम नेने यांचा हा व्हिडीओ पाहून आता चाहते त्यांचे खूप कौतुक करत आहेत. यावेळी अनेकांनी त्यांच्या मराठी भाषेचं खूप कौतुक केलं आहे. तर, काहींनी त्यांना ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला.