Salman Khan Birthday : बॉलिवूडचा भाईजान कमावतो किती? सलमान खानची संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan Birthday : बॉलिवूडचा भाईजान कमावतो किती? सलमान खानची संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे!

Salman Khan Birthday : बॉलिवूडचा भाईजान कमावतो किती? सलमान खानची संपत्ती ऐकून डोळे होतील पांढरे!

Dec 27, 2023 05:06 PM IST

Salman Khan Total Net Worth:अभिनय आणि शो होस्टिंगचं नाही, तर सलमान खान त्याच्या व्यवसायातून आणि वेगवेगळ्या गुंतवणुकांमधून देखील बक्कळ पैसे कमवतो.

Salman Khan Total Net Worth
Salman Khan Total Net Worth

Salman Khan Total Net Worth: बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात अभिनेता सलमान खान आज (२७ डिसेंबर) त्याचा ५८वा वाढदिवस साजरा करत आहे. सलमान खानच्या वाढदिवसानिमित्ताने आज चाहते जल्लोष करताना दिसत आहेत. सलमान हा केवळ चाहत्यांचाच नाही तर, बॉलिवूड कलाकारांचा देखील लाडका आहे. म्हणून सलमानला सगळेच 'भाई' म्हणतात. सलमान खान आपल्या दमदार चित्रपटांमधून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. १९८८मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटामधून सलमान खान याने आपल्या फिल्मी कारकिर्दीची सुरुवात केली होती. यांनतर त्याने कधीच मागे वळून पहिले नाही.

सलमान खान हा केवळ अभिनेताच नाही तर, निर्माता, शो होस्ट देखील आहे. सलमान खान सध्या 'बिग बॉस १७'चे सूत्रसंचालन करताना दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार सलमान खान याचं नेटवर्थ तब्बल २९०० कोटी इतकं आहे. या आकडेवारीनुसार, सलमान खान वर्षाला २२० कोटी तर, महिन्याला १६ कोटी रुपयांची कमाई करतो. अभिनय आणि शो होस्टिंगचं नाही, तर सलमान खान त्याच्या व्यवसायातून आणि वेगवेगळ्या गुंतवणुकांमधून देखील बक्कळ पैसे कमवतो. सलमान खान याने 'सलमान खान फिल्म्स' या नावाने २०११मध्ये एक प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे. तर, 'बिईंग ह्युमन' नावाचा त्याचा स्वतःच एक ब्रँड असून, मध्य आशिया आणि युरोपसारख्या देशांमध्ये देखील प्रसिद्ध आहे.

Ranbir Kapoor: केकवर दारू ओतत रणबीर कपूर असं काय म्हणाला की नेटकरीही संतापले? Video Viral

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान खान दरवर्षी चित्रपटांमधून १०० कोटी तर, तर इतर ब्रँड एन्डोर्समेंटमधून तो तब्बल ३०० कोटी रुपये कमावतो. या शिवाय तो चित्रपटाच्या एकूण नफ्यातील ६०-७० टक्के हिस्सा देखील घेतो. तर, 'बिग बॉस' या त्याच्या लोकप्रिय शोच्या होस्टिंगसाठी सलमान खान आठवड्याचे २५ कोटी रुपये फी म्हणून आकारतो. तर, सलमान खान आठवड्यातून केवळ दोनच एपिसोड चित्रित करतो. याचाच अर्थ त्याला एका एपिसोडसाठी तब्बल १२.५० कोटी दिले जातात. या व्यतिरिक्त, 'यात्रा' या ट्रॅव्हल कंपनीमध्ये सलमान खानचा ५% हिस्सा आहे. तसेच, 'चिंगारी' नावाच्या एका कंपनीमध्येही त्याने गुंतवणूक केली आहे.

सलमान खानच्या आलिशान घराबद्दल बोलायचे तर, मुंबईतील वांद्रे येथे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान खानचे घर आहे, ज्याची किंमत तब्बल १०० कोटी आहे. याशिवाय त्याच्याकडे पनवेल आणि गोराई येथील फार्म हाऊस देखील आहेत. तब्बल १५० एकर जागेत त्याचे फार्म हाऊस बांधण्यात आले आहे. त्याच्याकडे ऑडी, मर्सिडीज, रेंज रोव्हर, पोर्श यासारख्या महागड्या कार्स आणि अनेक सुपर बाईक्स आहेत.

Whats_app_banner