मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Koffee With Karan 8: रणवीर सिंहची विल स्मिथसोबत होतेय तुलना! दीपिकाच्या 'त्या' वक्तव्यामुळे अभिनेता ट्रोल

Koffee With Karan 8: रणवीर सिंहची विल स्मिथसोबत होतेय तुलना! दीपिकाच्या 'त्या' वक्तव्यामुळे अभिनेता ट्रोल

Oct 27, 2023, 12:24 PM IST

  • Koffee With Karan 8 Deepika Padukone: 'कॉफी विथ करण ८'मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

Ranveer deepika

Koffee With Karan 8 Deepika Padukone: 'कॉफी विथ करण ८'मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

  • Koffee With Karan 8 Deepika Padukone: 'कॉफी विथ करण ८'मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत.

Koffee With Karan 8 Deepika Padukone: 'कॉफी विथ करण'चा आठवा सीझन नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी जोडीने हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक खुलासे केले. या दरम्यान दीपिका पदुकोण हिने अशा काही गोष्टी सांगितल्या, ज्या ऐकून स्वतः रणवीर सिंह याला देखील आश्चर्याचा धक्का बसला होता. तर, या गोष्टी समोर आल्यानंतर आता नेटकरी रणवीर सिंह यालाच ट्रोल करत आहेत. रणवीर सिंह याची तुलना थेट विल स्मिथ याच्याशी केली आहे. असं दीपिका नेमकं काय म्हणाली, हे तुम्हाला माहीत आहे का?

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

'कॉफी विथ करण ८'मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. यावेळी दीपिका पदुकोण हिने स्वतःच्या आयुष्यातील एक मोठं सत्य सांगितलं आहे. रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह याची एंट्री झाली होती. त्यावेळी दीपिका नैराश्याचा सामना करत होती. या नैराश्यातून तिला बाहेर काढण्याचं काम रणवीरने केलं होतं. त्यावेळी रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला होता. मात्र, दीपिकाला पुन्हा रिलेशनशिपमध्ये अडकायचं नव्हतं. त्यामुळे ती या सगळ्याचा फार विचार करत नव्हती. तर, दुसरीकडे रणवीरसोबत असताना देखील आणखी काही लोकांना डेट करत होती. हा खुलासा ऐकून रणवीरही थक्क झाला होता. हे लोक कोण होते, असं विचारताच दीपिका म्हणाली की, आता तिला त्यांची नावं आठवत नाहीत.

मात्र, यावेळी रणवीर काहीसा नाराज झालेला दिसला. रणवीर सिंह नेहमीच आपल्या पत्नीची बाजू घेताना दिसला आहे. तो नेहमीच दीपिकाचं कौतुक करताना दिसला आहे. मात्र, आता दीपिकाचं बोलणं ऐकून त्यालाही धक्का बसला आहे. या मुलाखतीत त्यांनी आपल्या प्रेमकहाणी सोबतच त्यांच्या लग्नातील काही क्षण शेअर केले होते. मात्र, आता त्यांच्यातील या खुलाशावरून आता नेटकरी चांगले ट्रोल करत आहे. ऑस्कर सोहळ्यात हॉलिवूड स्टार विल स्मिथ याच्या पत्नीवर विनोद केल्याने त्याने होस्टच्या कानशिलात लगावली होती. मात्र, याच्या काही दिवसानंतर त्याच्या पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेत त्याला धक्का दिला होता. त्यामुळेच आता रणवीर आणि विल स्मिथची तुलना केली जात आहे.

पुढील बातम्या