मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shehzada Release Date: ‘पठाण’चा धुमाकूळ पाहून ‘शहजादा’ही थांबला; कार्तिकच्या चित्रपटाचे रिलीज लांबणीवर!

Shehzada Release Date: ‘पठाण’चा धुमाकूळ पाहून ‘शहजादा’ही थांबला; कार्तिकच्या चित्रपटाचे रिलीज लांबणीवर!

Jan 31, 2023, 08:02 AM IST

    • Shehzada Release Date Postpone : ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून कार्तिक आर्यन स्टारर 'शहजादा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.
Shehzada Release Date Postpone

Shehzada Release Date Postpone : ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून कार्तिक आर्यन स्टारर 'शहजादा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

    • Shehzada Release Date Postpone : ‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून कार्तिक आर्यन स्टारर 'शहजादा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे.

Shehzada Release Date Postpone : बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा ‘पठाण’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शाहरुखचा हा चित्रपट दर दिवशी तब्बल १०० कोटींची कमाई करत आहे. मात्र, ‘पठाण’सोबत रिलीज झालेल्या चित्रपटांना याचा मोठा फटका बसला आहे. याचाच विचार करून आता कार्तिक आर्यन अभिनित ‘शहजादा’ हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला आहे. मेकर्सनी ‘शहजादा’ या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Gui Gadkari Health: अभिनेत्री जुई गडकरी अजूनही आजारीच, चाहतीच्या कमेंटवर दिले उत्तर

नेहमी तर आईसोबत दिसते, मग शाळेत कधी जाते?; आराध्याला ट्रोल करणाऱ्यांना ऐश्वर्याचे उत्तर

मुक्ताला कळाले सत्य, माधवीने पाहिली ती कार.. काय घडणार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत?

सायली अर्जुनचं घर सोडून निघून जाणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार धक्कादायक वळण

‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून कार्तिक आर्यन स्टारर 'शहजादा' चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची नवीन रेलीज डेट जाहीर केली. हा चित्रपट आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांचा 'शहजादा' चित्रपट व्हॅलेंटाईन वीक लक्षात घेऊन १० फेब्रुवारीला रिलीज होणार होता. पण, आता तो १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शाहरुख खानच्या चित्रपटासाठी त्यांनी 'शहजादा' रिलीज लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला असल्याचे मेकर्सचे म्हणणे आहे. कार्तिक आणि क्रिती व्यतिरिक्त या चित्रपटात मनीषा कोईराला, परेश रावल, रोनित रॉय, राजपाल यादव आणि सचिन खेडकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अल्लू अर्जुनचा तेलुगु हिट चित्रपट 'अला वैकुंठापुरमुलू'चा हा हिंदी रिमेक असणार आहे.

कार्तिकच्या ‘शहजादा’चा धमाकेदार ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननची जोडी पाहायला मिळत आहे. ‘लुकाछुपी’नंतर पुन्हा एकदा ही जोडी मोठ्या पडद्यावर अप्रतिम दिसत आहे. दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहून चाहते अक्षरशः जल्लोष आहेत. ‘शहजादा’ या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहते त्याच्या या चित्रपटाची आतुरतेने वाट बघत आहेत. या चित्रपटाशी संबंधित अपडेट जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

पुढील बातम्या