मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kantara: ‘कांतारा’ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुस्साट! पार केला ३०० कोटींचा टप्पा

Kantara: ‘कांतारा’ची गाडी बॉक्स ऑफिसवर सुस्साट! पार केला ३०० कोटींचा टप्पा

Nov 04, 2022, 04:02 PM IST

  • Kantara : ‘कांतारा’ चित्रपटाने सध्या जागतिक बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Kantara

Kantara : ‘कांतारा’ चित्रपटाने सध्या जागतिक बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

  • Kantara : ‘कांतारा’ चित्रपटाने सध्या जागतिक बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

Kantara Worldwide Collection : ऋषभ शेट्टी लिखित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘कांतारा’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने सध्या जागतिक बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींचा टप्पा पार करत नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर जवळपास २८५ कोटींची कमाई केली आहे. अवघ्या १६ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे कलेक्शन जबरदस्त आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

ऋषभ शेट्टी स्टारर या चित्रपटाने हिंदी भाषेतही जबरदस्त कमाई करत जवळपास ५० कोटींचा टप्पा गाठला आहे. ‘केजीएफ चॅप्टर २’नंतर ३०० कोटींहून अधिक कमाई करणारा हा दुसरा कन्नड चित्रपट ठरला आहे. सर्व भाषांमध्ये मिळून या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर २८५ कोटींचा व्यवसाय केला आहे. अशा प्रकारे या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात तब्बल ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हिंदी भाषिक क्षेत्रात या चित्रपटाची चांगलीच कमाई होत आहे. या चित्रपटाच्या हिंदी डब व्हर्जनने देखील आतापर्यंत जवळपास 50 कोटींचा व्यवसाय केला आहे. ‘बाहुबली’, ‘पुष्पा’, ‘आरआरआर’ आणि ‘केजीएफ’नंतर साऊथचा ‘कांतारा’ही स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरला आहे.

सुरुवातीला ‘कांतारा’ हा चित्रपट फक्त कन्नड भाषेत प्रदर्शित झाला होता, पण नंतर चित्रपटाला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहता निर्मात्यांनी तमिळ, हिंदी आणि तेलुगू भाषांमध्येही त्याचे डबिंग केले. इतर भाषांमध्ये रिलीज झाल्यानंतर ‘कांतारा’च्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे. 'कांतारा' हा एक अॅक्शन थ्रिलर चित्रपट आहे. 'कांतारा'मध्ये ऋषभ शेट्टीसह अच्युता कुमार, सप्तमी गौडा, प्रमोद शेट्टी आणि किशोर सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत.

IMDb वरही ‘कांतारा’ सर्वोत्कृष्ट रेटिंग भारतीय चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिससोबतच, आयएमडीबीवर सर्वोत्तम रेटिंग मिळवण्याच्या बाबतीतही हा चित्रपट अव्वल ठरला आहे. चित्रपटाला IMDb वर ९.१ रेटिंग मिळाले आहे. यापूर्वी केजीएफ २ हा चित्रपट आयएमडीबीवर सर्वोत्तम रेटिंग मिळवण्याच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर होता. मेकिंग बजेट वसूल करून या चित्रपटाने मोठा नफा कमावला आहे. सर्वाधिक कमाई करणाऱ्या कन्नड चित्रपटांच्या यादीत आता ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’चा देखील समावेश झाला आहे.

 

पुढील बातम्या