मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Kantara: अंगाचा थरकाप उडण्यासारखं 'कांतारा'मध्ये आहे काय? कंगना काय म्हणते ऐका!

Kantara: अंगाचा थरकाप उडण्यासारखं 'कांतारा'मध्ये आहे काय? कंगना काय म्हणते ऐका!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Nov 01, 2022 08:17 PM IST

Kangana on Kantara: कांतारा हा कानडी सिनेमा पाहून अभिनेत्री कंगना राणावत अक्षरश: भारावून गेली आहे.

Kantara HT
Kantara HT

Kangana on Kantara: कानडी चित्रपट 'कांतारा'वर सध्या सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सेलिब्रिटींबरोबरच चित्रपट समीक्षकही 'कांतारा'वर स्तुतीसुमनं उधळत आहेत. आता अभिनेत्री कंगना राणावत हिची यात भर पडली आहे. 'कांतारा' बघून कंगना भारावून गेली आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर तिनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. तसंच, एक सविस्तर पोस्टही लिहिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कंगनानं गुरुवारी संध्याकाळी कांतारा सिनेमा पाहिला. त्यानंतर ती चित्रपटाच्या प्रेमातच पडली आहे. ‘नुकताच मी कुटुंबीयांसमवेत एक सिनेमा पाहिला. कांतारा असं सिनेमाचं नाव आहे. हा चित्रपट म्हणजे एक भन्नाट अनुभव आहे. मी अजूनही थरथरत आहे. ऋषभ शेट्टी तुला सलाम. याला म्हणतात सिनेमा. असे थराराक अनुभव देण्यासाठीच चित्रपट असतो. थिएटरमध्ये असताना लोकांच्या प्रतिक्रिया मी ऐकत होते. असं यापूर्वी कधीच पाहिलं नव्हतं असं प्रेक्षक म्हणत होते. पुढचे आठ दिवस मी स्वत: सुद्धा या अनुभवातून बाहेर पडू शकणार नाही,’ असं कंगनानं चित्रपट पाहिल्यानंतर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.

भारत ही रहस्यांची भूमी

कंगनानं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहून चित्रपटासह दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचं तोंडभरून कौतुक केलं आहे. 'कांताराला पुढच्या वर्षी ऑस्करमध्ये प्रवेश मिळावा, असं मला वाटतं. अद्याप वर्ष बाकी आहे आणि आणखीही काही चांगले चित्रपट येऊ शकतात याची मला जाणीव आहे. पण ऑस्करमध्ये भारताचं योग्य प्रतिनिधित्व होणं जास्त महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनं हा सिनेमा उत्तम आहे. भारत ही एक गूढ भूमी आहे. साधकांची भूमी आहे. या भूमीला समजण्याच्या भानगडीत न पडता केवळ आलिंगन द्यावं. तेच आपल्या हातात आहे. तुम्ही भारताला समजण्याचा प्रयत्न कराल तर केवळ निराशा हाती लागेल. पण भारत नावाच्या चमत्काराला समर्पित भावनेनं आपलंसं कराल तर तुम्ही या चमत्काराचा भाग होऊन जाल. कांतारा हे प्रत्येकानं अनुभवावं असं वास्तव आहे, संपूर्ण जगानं त्याची अनुभूती घेतली पाहिजे, असं कंगनानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

IPL_Entry_Point

विभाग