मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Raveena Tandon Birthday: अक्षय कुमारला 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं अन् रवीना टंडननं ब्रेकअपच केला!

Raveena Tandon Birthday: अक्षय कुमारला 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीसोबत रंगेहाथ पकडलं अन् रवीना टंडननं ब्रेकअपच केला!

Oct 26, 2023, 07:45 AM IST

  • Happy Birthday Raveena Tandon: बॉलिवूड सृष्टीत एक काळ असा होता जेव्हा रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या प्रेम कहाणीचे किस्से रंगत होते.

Raveena Tandon Birthday

Happy Birthday Raveena Tandon: बॉलिवूड सृष्टीत एक काळ असा होता जेव्हा रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या प्रेम कहाणीचे किस्से रंगत होते.

  • Happy Birthday Raveena Tandon: बॉलिवूड सृष्टीत एक काळ असा होता जेव्हा रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या प्रेम कहाणीचे किस्से रंगत होते.

Happy Birthday Raveena Tandon: बॉलिवूडची 'टीप टीप बरसा गर्ल' अर्थात अभिनेत्री रवीना टंडन आज (२६ ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. रवीना सध्या चित्रपटांमध्ये काम करत नसली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांशी कनेक्टेड आहे. रवीना टंडन हिने आपल्या अभिनयाने ९०चं दशक चांगलंच गाजवलं होतं. केवळ अभिनयच नाही, तर अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत आली होती. बॉलिवूड सृष्टीत एक काळ असा होता जेव्हा रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्या प्रेम कहाणीचे किस्से रंगत होते. बॉलिवूडमध्ये सगळीकडेच केवळ रवीना आणि अक्षयच्या प्रेमाचा बहार होता. दोघांची जोडी लग्न बंधनात अडकेल, असे वाटत असतानाच त्यांच्या या नात्यात मीठाचा खडा पडला आणि होत्याचं नव्हतं झालं.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

तो ९०च्या दशकाचा एका काळ होता जेव्हा अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री रवीना टंडन एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. दोघांनी सगळ्यांसमोर प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. सगळेच या जोडीला 'बेस्ट कपल' म्हणत असतानाच यांनी आपापले मार्ग वेगळे करून सगळ्यांनाच धक्का दिला होता. विशेष म्हणजे त्यावेळी दोघांचा साखरपुडा देखील झाला होता, असे म्हटले जाते. मात्र, अचानक एक मोठं वादळ आलं आणि या दोघांचं नातं त्यासमोर टॅग धरू शकलं नाही. दोघांचा ब्रेकअप झाल्यानंतर ते पुन्हा कधीही एकत्र दिसले नाहीत. इतकंच काय तर त्यांनी एकमेकांचं नाव घेणं देखील टाळलं. दोघांचं एकमेकांवर इतकं प्रेम असताना नेमका ब्रेकअप का झाला? या विषयी नेहमीच चर्चा रंगताना दिसते.

RajKummar Rao: भारतीय निवडणूक आयोगाचा चेहरा बनला राजकुमार राव; देशभरात जनजागृती करणार!

अक्षय आणि रवीना ही जोडी १९९४मध्ये रिलीज झालेल्या 'मोहरा' या चित्रपटातून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या चित्रपटानंतर लगेचच म्हणजेच १९९५मध्ये अक्षय आणि रवीना एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. इतकंच नाही तर, या दोघांनी मंदिरात जाऊन प्रेमाच्या आणाभाका घेत साखरपुडा केल्याचे देखील म्हटले जात होते. मात्र, त्यानंतर हे नातं फार काळ टिकू शकलं नाही. या ब्रेकअपला तशी अनेक कारणं होती. मात्र, मुख्य कारण ठरलं अभिनेत्री रेखा. 'खिलाडीयों का खिलाडी' या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि रेखा एकत्र झळकले होते. या चित्रपटादरम्यान त्यांच्यात जवळीक वाढली होती. या चित्रपटाच्या एका पार्टीत रात्री उशिरापर्यंत एकमेकांसोबत एन्जॉय करताना अक्षय कुमार आणि रेखा यांना रवीनाने पाहिले.

यानंतर संतापलेल्या रवीनाने अक्षय कुमारसोबतचं नातं तोडून टाकण्याचा निर्णय घेतला होता. अभिनेत्री रेखा याच अक्षय आणि रवीनाच्या नात्याचा शेवट करण्यासाठी कारणीभूत ठरल्या होत्या. यानंतर अक्षय कुमार आणि रवीना पुन्हा कधीच एकत्र दिसले नाहीत. तर, रवीनासोबत रिलेशनशिपमध्ये असताना अक्षय कुमार शिल्पा शेट्टीला देखील डेट करत होता, असे म्हटले जाते. ही गोष्ट कळताच रवीनाने अक्षयपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचे देखील बोलले जाते.

पुढील बातम्या