मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Leo VS Jawan Box Office collections: थलापती विजय की शाहरुख खान; कोण जिंकणार बॉक्स ऑफिसची शर्यत?

Leo VS Jawan Box Office collections: थलापती विजय की शाहरुख खान; कोण जिंकणार बॉक्स ऑफिसची शर्यत?

Oct 25, 2023 12:51 PM IST

Leo vs Jawan Box Office collections comparison:'जवान'च्या झंझावातात थलापती विजयचा 'लिओ' हा चित्रपट आता चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आता शाहरुख खान आणि थलापती विजय यांच्यात तंगडी टक्कर पाहायला मिळणार आहे.

Leo VS Jawan Box Office
Leo VS Jawan Box Office

Leo vs Jawan Box Office collections comparison: सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चित्रपट रसिकांना अक्षरशः मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. मात्र, शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाच्या वादळाने सगळेच चित्रपट झाकोळले गेले आहेत. 'जवान'ची क्रेझ इतकी आहे की, चाहते अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. मात्र, या दरम्यान रिलीज झालेल्या साऊथच्या 'लिओ' या चित्रपटाने शाहरुखच्या 'जवान'ला देखील मागे टाकण्याची तयारी केली आहे. 'जवान'च्या झंझावातात थलापती विजयचा 'लिओ' हा चित्रपट आता चांगलाच धुमाकूळ घालत आहे. आता शाहरुख खान आणि थलापती विजय यांच्यात तंगडी टक्कर पाहायला मिळणार आहे. जाणून घ्या या दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन...

ओपनिंग डे कलेक्शन

'लिओ' या चित्रपटाने पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी ६४.८ कोटींची कमाई करून दमदार सुरुवात केली आहे. तर, 'जवान'ने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केल्याने यात तो आघाडीवर आहे.

वीकेंड कलेक्शन

पहिल्या आठवड्यातील, शुक्रवारी 'लिओ'ने ११६.६ कोटींची कमाई केली होती. तर, शनिवार आणि रविवारी यात थोडी वाढ झाली. तर, 'जवान'सोबत याची तुलना केली तर, पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने २११.६ कोटींची कमाई केली होती.

ट्रेंडिंग न्यूज

IFFI 2023: यंदा 'इफ्फी'त मराठी चित्रपटांना केवळ 'इतकी'च जागा! पाहा कोणकोणते चित्रपट दाखवले जाणार...

पहिला सोमवार कलेक्शन

वीकेंडनंतरच्या पहिल्या सोमवारी दोन्ही चित्रपटांच्या कमाईत घट झाली होती. 'लिओ'ने ३५.१९ कोटी कमावले, तर 'जवान'ने ३२.९२ कोटी कमावले होते.

पहिला मंगळवार कलेक्शन

मंगळवारच्या सुरुवातीच्या आकडेवारी नुसार, 'लिओ'ने २८ कोटी रुपये कमावले आहेत. तर, 'जवान'ने देखील पहिल्या मंगळवारी २६ कोटींची कमाई केली होती.

एकूण सहा दिवसांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन

थलापती विजयच्या 'लिओ'ने पहिल्या सहा दिवसांत २४४.५९ कोटींची कमाई केली आहे. तर, 'जवान'ने पहिल्या सहा दिवसांत एकूण ३४५.११ कोटी कमावले होते.

लिओ की जवान? बाजी कुणाची?

'जवान' चित्रपटाने धमाकेदार सुरुवात करत आठवड्याच्या शेवटी देखील ही गती कायम राखली होती. मात्र, सोमवारी दोन्ही चित्रपटांनी काही अंशी घसरण अनुभवली होती. मात्र, मंगळवारी 'लिओ'ला थोडासा फायदा झाला आहे. मात्र, एकूण सहा दिवसांचे कलेक्शन पाहता 'जवान' चित्रपट आघाडीवर आहे. शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटाने सहा दिवसांत ३०० कोटींचा टप्पा ओलांडला होता, तर 'लिओ'ने २५० कोटींची कमाई केली आहे.

WhatsApp channel