मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Pooja Bhatt Birthday: अभिनेत्याकडून मारहाण अन् वडिलांसोबत लीपलॉक; नेहमीच वादात राहिलीय पूजा भट्ट

Pooja Bhatt Birthday: अभिनेत्याकडून मारहाण अन् वडिलांसोबत लीपलॉक; नेहमीच वादात राहिलीय पूजा भट्ट

Feb 24, 2023, 10:19 AM IST

  • Happy Birthday Pooja Bhatt: लग्न, अफेयर, बॉलिवूड अभिनेत्याकडून मारहाण आणि वडील महेश भट्ट यांच्यासोबत लीपलॉक यामुळे पूजा नेहमीच चर्चेचा विषय ठरली.

Pooja Bhatt

Happy Birthday Pooja Bhatt: लग्न, अफेयर, बॉलिवूड अभिनेत्याकडून मारहाण आणि वडील महेश भट्ट यांच्यासोबत लीपलॉक यामुळे पूजा नेहमीच चर्चेचा विषय ठरली.

  • Happy Birthday Pooja Bhatt: लग्न, अफेयर, बॉलिवूड अभिनेत्याकडून मारहाण आणि वडील महेश भट्ट यांच्यासोबत लीपलॉक यामुळे पूजा नेहमीच चर्चेचा विषय ठरली.

Happy Birthday Pooja Bhatt: बॉलिवूड अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पूजा भट्ट आज (२४ फेब्रुवारी) आपला वाढदिवस साजरा करत आहे. पूजा भट्ट आता अभिनयविश्वापासून दूर असली, तरी तिने बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले आहे. पूजा भट्ट ९०च्या दशकातील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक मानली जात होती. तिचे व्यावसायिक जीवन जितके चर्चेचा विषय होते. तितकेच तिचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच प्रसिद्धी झोतात राहिले. लग्न, अफेयर, बॉलिवूड अभिनेत्याकडून मारहाण आणि वडील महेश भट्ट यांच्यासोबत लीपलॉक यामुळे पूजा नेहमीच चर्चेचा विषय ठरली. तिचे आयुष्य खूप वादग्रस्त राहिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

पूजा भट्टचा जन्म २४ फेब्रुवारी १९७२ रोजी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या घरात झाला. मनोरंजन विश्वाची कौटुंबिक पार्श्वभूमी असल्याने अभिनेत्रीला अवघ्या १७ वर्षात पहिला चित्रपट मिळाला. पूजाचा पहिला चित्रपट ‘डॅडी’ होता. यानंतर पूजा भट्टने ‘दिल है के मानता नहीं’, ‘सडक’, ‘सर’, ‘हम दोनों’ आणि ‘चाहत’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. पूजाची कारकीर्द फार मोठी नसली, तरी तिचे काही चित्रपट नेहमीच लक्षात राहणारे आहेत.

पूजा भट्टने २००३मध्ये 'पाप' चित्रपट दिग्दर्शित केला होता. यादरम्यान तिची मनीष माखिजासोबत जवळीक वाढू लागली. डेटिंगच्या काही दिवसांतच पूजा आणि मनीष यांनी लग्न केले. मात्र, त्यांचे हे लग्न फार काळ टिकू शकले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला. यानंतर पूजा भट्टने 'जिस्म' चित्रपटाची निर्मिती केली होती. यादरम्यान ती अभिनेता रणवीर शौरीच्या जवळ आली. दोघांचे नाते फारसे चांगले नव्हते. दारूच्या नशेत दोघांमध्ये सतत भांडणं होत. एकदा रणवीर शौरीने पूजाला एवढी मारहाण केली होती की, तिला रक्तस्त्रावही झाला होता. त्यानंतर पूजाने रणवीरविरोधात केसही दाखल केली होती.

९०च्या दशकांतच पूजा भट्टची कारकीर्द यशस्वी होत असतानाच, महेश भट्ट आणि पूजा भट्ट यांच्या लीपलॉक किस करतानाचा फोटो एका मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आला होता. यादरम्यान, ‘पूजा जर माझी मुलगी नसती, तर मी तिच्याशी लग्न केले असते’, असे वादग्रस्त वक्तव्य महेश भट्ट यांनी केले होते. त्यामुळे देखील पूजा भट्ट मोठ्या वादात अडकली होती.

विभाग

पुढील बातम्या