मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Happy Birthday Amruta Khanvilkar: ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Happy Birthday Amruta Khanvilkar: ‘चंद्रमुखी’ अमृता खानविलकरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Nov 23, 2022, 09:33 AM IST

    • Amruta Khanvilkar Birthday: ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे... अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले.
Amruta Khanvilkar

Amruta Khanvilkar Birthday: ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे... अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले.

    • Amruta Khanvilkar Birthday: ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे... अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले.

Amruta Khanvilkar Birthday: आपल्या बहारदार नृत्यशैलीने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. ‘नटरंग’ चित्रपटातील ‘वाजले की बारा’ असो वा ‘चंद्रमुखी’तील ‘चंद्रा’ हे गाणे... अमृताने नेहमीच प्रेक्षकांना ताल धरायला भाग पाडले. आज अभिनेत्री-नृत्यांगना अमृता खानविलकर हिचा वाढदिवस आहे. २३ नोव्हेंबर १९८४ रोजी जन्मलेली अमृता खानविलकर यंदा तिचा ३४वा वादिवस साजरा करत आहे. सध्या अमृता ‘झलक दिखला जा’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

केवळ मराठीच नव्हे, तर अमृताने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे. तिच्या ‘वाजले की बारा’ने मात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं. या गाण्यामुळे अमृता खानविलकर हिला एक वेगळी ओळख मिळाली. मालिका, चित्रपट आणि रिअॅलिटी शोमधून तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. अनेक कार्यक्रमांमध्ये सूत्रसंचालिका म्हणून देखील ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. आपल्या अदांनी तिने नेहमीच प्रत्येक मंच गाजवला.

मराठीतील ‘गोलमाल’ चित्रपटातून तिने मनोरंजन विश्वात पहिले पाऊल टाकले. या चित्रपटानंतर अमृताने कधीही मागे वळून पाहिलं नाही. ‘साडे माडे तीन’, ‘नटरंग’, ‘धूसर’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘सतरंगी’, ‘बाजी’, ‘शाळा’, ‘चोरीचा मामला’, ‘चंद्रमुखी’ अशा मराठी चित्रपटांमध्ये अमृताने आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला. केवळ मराठीच नव्हे तर, ‘फुंक’, ‘फुंक २’, ‘मलंग’, ‘राझी’ आणि ‘सत्यमेव जयते’ अशा हिंदी चित्रपटांमध्येही ती झळकली. ‘बोम्मई’ नावाच्या एका तमिळ चित्रपटातदेखील अमृताने काम केले आहे. या सोबतच ‘झलक दिखला जा’, ‘खतरों के खिलाडी सीझन १०’, ‘कॉमेडी नाईट्स बचाओ’सारख्या रिअॅलिटी शोमधून देखील ती चमकली.

मनोरंजन विश्वात प्रचंड सक्रिय असणाऱ्या अमृता खानविलकर हिने अभिनेता हिमांशू मल्होत्रा याच्या सोबत लग्नगाठ बांधली आहे. ‘इंडियाज बेस्ट सिनेस्टार की खोज’ या कार्यक्रमाच्या सेटवर हिमांशू आणि अमृताची मैत्री झाली. हळूहळू या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि १० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१५मध्ये त्यांनी लग्न केले.

पुढील बातम्या