मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका’; ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या निर्मात्याचे पोलिसांना पत्र

‘माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला धोका’; ‘गांधी गोडसे’ चित्रपटाच्या निर्मात्याचे पोलिसांना पत्र

Jan 24, 2023, 07:53 AM IST

    • Gandhi Godse EK Yudh: ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटावरून सध्या अनेक वाद निर्माण होताना दिसत आहेत. हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.
Rajkumar Santoshi

Gandhi Godse EK Yudh: ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटावरून सध्या अनेक वाद निर्माण होताना दिसत आहेत. हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

    • Gandhi Godse EK Yudh: ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटावरून सध्या अनेक वाद निर्माण होताना दिसत आहेत. हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

Gandhi Godse EK Yudh: प्रसिद्ध बॉलिवूड निर्माते राजकुमार संतोषी यांनी नुकतीच त्यांच्या ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाच्या रिलीजची घोषणा केली आहे. मात्र, या चित्रपटावरून सध्या अनेक वाद होताना दिसत आहेत. यातच आता निर्मात्याने आपल्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे. केवळ आपणच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या जीवाला सध्या धोका असल्याचे राजकुमार संतोषी यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी मुंबई पोलिसांना एक पत्र लिहून आपल्यासह संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा पुरवण्याची विनंती केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

राजकुमार संतोषी यांचा ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट येत्या २६ जानेवारीला चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे. सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन देखील सुरू आहे. मात्र, या प्रमोशन दरम्यान अनेक वाद उफाळून येताना दिसत आहेत. काही ठिकाणी चित्रपटाविरोधात निदर्शने करण्यात आली आहेत. तर, काही ठिकाणी प्रमोशन दरम्यान गदारोळ देखील माजला होता. या सगळ्या प्रकारामुळे राजकुमार संतोषी यांनी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांना एक पत्र लिहित सुरक्षा मागितली आहे.

या पत्रात राजकुमार संतोषी यांनी लिहिले की, ‘माझ्या गांधी गोडसे चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान काही लोकांनी वाईट मनसुब्याने गदारोळ माजवला होता. यानंतर मला देखील अनेकवेळा धमक्या दिल्या जात आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे मला सतत असुरक्षित वाट असून, या दरम्यान माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी शक्यता आहे.’

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटात महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्या विरोधाभासी विचारसरणीचे चित्रण करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट निर्मात्यांनी या विषयावर चित्रपट बनवण्याची घोषणा केली होती. या चित्रपटाला एआर रहमान संगीत देणार असून. ‘संतोषी प्रॉडक्शन’च्या मनिला संतोषी निर्मित, हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

विभाग

पुढील बातम्या