मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अशोक सराफ सगळ्यांचे मामा कसे झाले ठाऊक आहे का? वाचा त्यामागची भन्नाट स्टोरी

अशोक सराफ सगळ्यांचे मामा कसे झाले ठाऊक आहे का? वाचा त्यामागची भन्नाट स्टोरी

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 04, 2022, 05:08 PM IST

    • आज ४ जून रोजी अशोक मामांचा वाढदिवस आहे. अशोक मामा आज त्यांच्या वयाची ७५ वर्ष पूर्ण करत आहेत. सोबतच आजच्याच दिवशी अशोक मामा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची ५० वर्ष पूर्ण केली आहेत.
अशोक सराफ

आज ४ जून रोजी अशोक मामांचा वाढदिवस आहे. अशोक मामा आज त्यांच्या वयाची ७५ वर्ष पूर्ण करत आहेत. सोबतच आजच्याच दिवशी अशोक मामा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची ५० वर्ष पूर्ण केली आहेत.

    • आज ४ जून रोजी अशोक मामांचा वाढदिवस आहे. अशोक मामा आज त्यांच्या वयाची ७५ वर्ष पूर्ण करत आहेत. सोबतच आजच्याच दिवशी अशोक मामा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची ५० वर्ष पूर्ण केली आहेत.

आपल्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावणारे मराठमोळे अभिनेते अशोक सराफ (ashok saraf) हे मराठी चित्रपटसृष्टीतल्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहेत. आज ४ जून रोजी अशोक मामांचा वाढदिवस आहे. अशोक मामा आज त्यांच्या वयाची ७५ वर्ष पूर्ण करत आहेत. सोबतच आजच्याच दिवशी अशोक मामा यांनी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांची ५० वर्ष पूर्ण केली आहेत. त्यामुळे आजचा दिवस मामांसाठी खास आहे. परंतु, अशोक यांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मामा का म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे का?

ट्रेंडिंग न्यूज

दिवाळीच्या मुहूर्तावर होणार पैशांची बरसात! ‘ये रे ये रे पैसा ३’ पुन्हा बॉक्स ऑफिसवर धमाल उडवणार

विनोदाची पातळी इतकी खाली गेलीये? कुशल बद्रिके आणि हेमांगी कवीच्या ‘मॅडनेस मचायेंगे’वर संतापले प्रेक्षक

तेजश्री प्रधानच्या मालिकेने पुन्हा मारली बाजी! जुई गडकरी ठरली नंबर वन! पाहा मराठी मालिकांचा टीआरपी रिपोर्ट

एक-दोन नव्हे, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘सोढी’ वापरत होता १० बँक अकाऊंट! पोलिसांनी केला नवा खुलासा

हा किस्सा अशोक सराफ यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, अशोक मामांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांचा सगळीकडे फार दरारा होता. त्यांच्याशी बोलताना सगळेच अदबीने बोलत असत. पण ते सगळ्यांना तितकेच जवळचेही वाटत. एक दिवस एका खेड्यात चित्रीकरण होतं. तेथे सेटवर काम करणारे स्पॉट दादा त्यांच्या भाचीला चित्रीकरण दाखवायला घेऊन आले होते. स्पॉट दादांच्या भाचीने त्यांच्याकडे अशोक यांना भेटण्याचा हट्ट केला. ते दोघेही जेव्हा अशोक यांच्या समोर आले तेव्हा भाचीने विचारलं मी यांना काय हाक मारू. त्यावर ते म्हणाले दादा नको आणि सर तर खूप लांबचं वाटतं. मामा आपला जवळचा असतो म्हणून तू यांना मामा हाक मार. त्यामुलीने अशोक यांना मामा म्हणून हाक मारली. तेव्हापासून सेटवरचे सगळे त्यांना मामा म्हणून संबोधू लागले.

थोड्याच कालावधीत फक्त सेट नाही तर संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये ते अशोक मामा म्हणून संबोधले जाऊ लागले. अशा प्रकारे अशोक सराफ यांना मामा हे नाव पडलं. अशोक हे इतकी वर्ष खरच सगळ्यांचे मामा म्हणूनच वागले. त्यांच्या वागण्यातली आपुलकी आणि त्यांची माणुसकी याची चर्चा आजही चित्रपटसृष्टीमध्ये केली जाते.

पुढील बातम्या