मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अशोक सराफ म्हणतात, 'शाहरुखसारखा माणूस मी आजवर पाहिलेला नाही'

अशोक सराफ म्हणतात, 'शाहरुखसारखा माणूस मी आजवर पाहिलेला नाही'

Payal Shekhar Naik HT Marathi

Apr 11, 2022, 04:40 PM IST

    • मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी शाहरुखसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.
अशोक सराफ- शाहरुख खान

मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी शाहरुखसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

    • मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी शाहरुखसोबत काम करतानाचा अनुभव सांगितला आहे.

प्रेक्षकांचे लाडके आणि संपूर्ण मराठी सिनेसृष्टीचे मामा असणारे लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ यांनी नुकतीच सोनी मराठी वाहिनीवरील 'इंडियन आयडल मराठी' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. अशोक यांनी मराठी सोबतच हिंदी चित्रपटातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. या कार्यक्रमात अशोक यांनी शाहरुखसोबत काम करतानाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याची काम करण्याची पद्धत, त्याची शिस्त याबद्दल सांगत मामांनी शाहरुखच्या वागण्याचं कौतुकच केलं.

ट्रेंडिंग न्यूज

नेमकी काय आहे ‘हीरामंडी’तील आदिती राव हैदरीने केलेली ‘गजगामिनी चाल’? कामसूत्राशी आहे कनेक्शन

‘बस करा आता... बंद करा मालिका’; अपर्णा आणि अर्जुनच्या ‘अप्पी आमची कलेक्टर’वर का वैतागले प्रेक्षक?

काय होतास तू... काय झालास तू.... ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम गुरुचरण सिंहची अवस्था बघून चाहते हळहळले!

कान्स फिल्म फेस्टिव्हलमधून परतताच ऐश्वर्या रायच्या हातावर शस्त्रक्रिया होणार! अभिनेत्रीला नेमकं काय झालंय?

बॉलिवूडचा किंग असणारा याच्यासोबत अशोक यांनी चार चित्रपट केले. या चित्रपटात काम करतानाचा अनुभव सांगताना अशोक म्हणाले, 'तुम्हाला विश्वास बसणार नाही पण 'कोयला' चित्रपटासाठी सगळ्यात आधी माझी निवड झाली. शाहरुख आणि माधुरी तर माझ्या नंतर आले. मी पहिला होतो. मी शाहरुखसारखा मेहनती कलाकार यापूर्वी कधीही पाहिलेला नाही.मी 'कोयला' च्या चित्रीकरणादरम्यान त्याला म्हणालो शाहरुख मला एका सीनमध्ये जरा गडबड वाटतेय. तो लगेच म्हणाला, हा चला करूया मग आणखी एकदा रिहर्सल करूया चला.'

पुढे मामा म्हणाले, 'शाहरुख एखादा सीन चांगला बनवण्यासाठी खूप मेहनत घेतो. त्याची एक खूप चांगली सवय आहे की तो हजारदा रिहर्सल करत राहतो जोपर्यंत तो सीन चांगला होत नाही. मी त्याची ही सवय त्याच्यासोबतच्या चारही चित्रपटांच्या वेळेस अनुभवली आहे. तो आता एका वेगळ्या उंचीवर आहे. त्याला ते सहज मिळालेलं नाहीये. त्यासाठी शाहरुखने प्रचंड मेहनत केलीये. जेव्हा मेहनत करायची वेळ येते तेव्हा तो बाकी सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळेच तो आज त्या पदावर आहे.' अशोक मामा यांनी शाहरुख सोबत 'कोयला', 'येस बॉस', 'करन अर्जुन' आणि 'गुड्डू' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

विभाग

पुढील बातम्या