मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ‘कधीकाळी मामांसाठी स्पॉटबॉय म्हणून काम केलं अन् आता…’, टिळेकर यांची खास पोस्ट

‘कधीकाळी मामांसाठी स्पॉटबॉय म्हणून काम केलं अन् आता…’, टिळेकर यांची खास पोस्ट

Payal Shekhar Naik HT Marathi

Jun 04, 2022, 04:57 PM IST

    • लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही एक पोस्ट करत अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महेश टिळेकर- अशोक सराफ

लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही एक पोस्ट करत अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

    • लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर यांनीही एक पोस्ट करत अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गेली कित्येक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे मराठी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय अभिनेते अशोक सराफ (ashok saraf) यांचा आज वाढदिवस. विनोदी असो किंवा खलनायक अशोक यांनी त्यांच्या अभिनयाने प्रत्येक भूमिका जिवंत केली. मामांच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. लोकप्रिय दिग्दर्शक महेश टिळेकर(mahesh tilekar) यांनीही एक पोस्ट करत अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये त्यांनी आपण कधीकाळी अशोक मामांसाठी स्पॉटबॉयचं देखील काम केल्याचं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आख्या महाराष्ट्राचा बिहार करुन टाकला; गौतमी पाटील-उत्कर्ष शिंदेच्या गाण्यावर नेटकरी संतापले

मतदान यादीतून नाव डिलिट झाल्यावरही करता येणार मतदान! मराठमोळ्या अभिनेत्रीने सांगितला उपाय

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

कलाने घेतला अद्वैतच्या खोलीचा ताबा, 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' मालिकेच्या आजच्या भागात काय घडणार?

महेश यांनी पोस्ट करत लिहिलं, 'अभिनय सम्राट अशोक सराफ. लहानपणी टिव्ही वर अशोक सराफ यांचे अनेक चित्रपट पाहिले, थिएटमध्ये त्यांच्या डायलॉग वर प्रेक्षकांच्या कडून मिळणारा टाळ्या शिट्ट्यांचा प्रतिसाद अनुभवला.पुढे चित्रपट क्षेत्रात स्ट्रगल करताना धरपकड सिनेमाच्या वेळी स्पॉट बॉय म्हणून अशोक सराफ यांना चहा, नाश्ता देण्याचं काम तर कधी एखाद्या सीनसाठी त्यांच्या मागे गर्दीत मॉब आर्टिस्ट म्हणून उभा राहणारा माझ्या सारख्या सामान्य माणसाला पुढे परमेश्वर कृपेने अशोक सराफ या असामान्य कलाकारासमोर दिग्दर्शक म्हणून उभे राहण्याची संधी मिळाली.आपल्या आवडत्या कलाकारा बरोबर काम करण्याची संधी मिळणे आणि त्याचा सहवास लाभणे याहून अधिक आनंद तो काय असू शकतो. जेंव्हा जेंव्हा आम्ही भेटतो तेंव्हा मित्राप्रमाणे गप्पांची मैफल रंगवणाऱ्या या विनोद सम्राटाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा'

 


महेश यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशोक मामा खरंच ग्रेट आहेत, त्यांच्यासारखा अभिनेता शोधूनही सापडणार नाही, अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी त्यांच्या पोस्टवर केल्या आहेत.

विभाग

पुढील बातम्या