मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss OTT 2: रितेश देशमुखची ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये एन्ट्री घेणार; सगळ्यांना ‘वेड’ लावणार!

Bigg Boss OTT 2: रितेश देशमुखची ‘ही’ अभिनेत्री ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये एन्ट्री घेणार; सगळ्यांना ‘वेड’ लावणार!

Jun 07, 2023, 12:27 PM IST

  • Bigg Boss OTT 2 latest update: लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होणार असून, यातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Bigg Boss OTT 2

Bigg Boss OTT 2 latest update: लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होणार असून, यातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

  • Bigg Boss OTT 2 latest update: लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होणार असून, यातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

Bigg Boss OTT 2 latest update:बिग बॉस ओटीटी’ सीझन १च्या यशानंतर आता या शोचा दुसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुपरस्टार सलमान खान लवकरच बिग बॉस ओटीटी होस्ट करताना दिसणार आहे. लवकरच ‘बिग बॉस ओटीटी २’ सुरू होणार असून, यातून अनेक नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी २’ हा रिअॅलिटी शो १७ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित होणार आहे. यंदा 'बिग बॉस ओटीटी २'मध्ये कोण कोण सहभागी होणार आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या शोसाठी अभिनेत्री जिया शंकरचे नाव फायनल करण्यात आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सावनीने आखला नवा डाव! मुक्ता करेल का सागर आणि आदित्यला माफ? 'प्रेमाची गोष्ट'मध्ये काय होणार जाणून घ्या

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

जिया शंकर एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे. तिने अनेक मालिकांमध्ये उत्कृष्ट अभिनय केला आहे. नुकतीच जिया शंकर अभिनेता रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात दिसली होती. मराठी चित्रपटापूर्वी जियाने साऊथ चित्रपटांमध्येही काम केले आहे. मॉडेल म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या जिया शंकरला 'मेरी हनीकारक बीवी' या मालिकेतून विशेष ओळख मिळाली. या शोमध्ये तिने ‘डॉ. इरावती इरा पांडे’ची भूमिका साकारली होती. जियाने 'काटेलाल अँड सन्स'मध्ये ‘सुशीला रुहेल’ची भूमिका साकारली होती. जियाने सब टीव्हीच्या 'गुड नाईट इंडिया'मध्ये होस्ट म्हणूनही काम केले होते.

Avatar 2: प्रतीक्षा संपली! ‘अवतार २’ आता घरबसल्या पाहता येणार! कधी व कुठे? जाणून घ्या...

२०१३मध्ये, शंकरने अभिनेता अजय मंथेनासोबत तेलुगू चित्रपट 'एंथा उंडांगा उन्नावे' मध्ये काम केले होते. यानंतर तिने आणखी एक तमिळ चित्रपट 'कनवू वरियम'मध्येही दमदार अभिनय केला. जियाने ‘अँड टीव्ही’च्या 'क्वीन्स है हम' मध्ये ‘श्रेया दीक्षित राठौर’ची भूमिका साकारली होती. जिया सध्या कलर्स टीव्हीवरील शो 'पिशाचिनी'मध्ये दिसत आहे. या शोमध्ये जिया हर्ष राजपूतसोबत ‘पवित्रा’ची भूमिका साकारत आहे. रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटात जियाने निशाची भूमिका साकारली आहे.

जिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे सुंदर फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. जिया खऱ्या आयुष्यात खूप बोल्ड आणि बिनधास्त आहे. सोशल मीडियावरही चाहते तिला खूप पसंत करतात.

विभाग

पुढील बातम्या