मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: टॉर्चर टास्कमुळे सुजले शिव ठाकरेचे डोळे; संतापलेल्या निम्रितने अर्चनाला सुनावले बोल!

Bigg Boss 16: टॉर्चर टास्कमुळे सुजले शिव ठाकरेचे डोळे; संतापलेल्या निम्रितने अर्चनाला सुनावले बोल!

Feb 04, 2023, 10:53 AM IST

    • Bigg Boss 16 Latest Update: अर्चनाने या टास्कमध्ये निम्रित कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना भरपूर टॉर्चर केले.
Bigg Boss 16

Bigg Boss 16 Latest Update: अर्चनाने या टास्कमध्ये निम्रित कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना भरपूर टॉर्चर केले.

    • Bigg Boss 16 Latest Update: अर्चनाने या टास्कमध्ये निम्रित कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना भरपूर टॉर्चर केले.

Bigg Boss 16 Latest Update: छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त शो ‘बिग बॉस १६’ आता महाअंतिम सोहळ्याच्या दिशेने सरकत आहे. या दरम्यान घरात टिकून राहण्यासाठी स्पर्धकांमध्ये मोठी चुरस रंगली आहे. बिग बॉस १६च्या बक्षिसाची रक्कम वाढवण्यासाठी नुकताच एक फिनाले टास्क आयोजित करण्यात आला होता. बिग बॉसचा हा टास्क इतका भयंकर होता की, तो संपल्यानंतरही त्याचे परिणाम अजूनही दिसत आहेत. या टास्कमध्ये कुणाचा डोळा सुजला तर कुणाला दुखापत झाली, त्यामुळे निम्रित कौर आणि अर्चना गौतम यांच्यात वाद देखील झाले.

ट्रेंडिंग न्यूज

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

‘अप्सरा’ सोनाली कुलकर्णी हिला कसा मिळाला होता पहिला चित्रपट? वाचा अभिनेत्रीविषयी काही भन्नाट गोष्टी!

टॉर्चर टास्क दरम्यान अर्चना गौतमने तिच्यावर झालेल्या टॉर्चरचा चांगलाच बदला घेतला. अर्चनाने या टास्कमध्ये निम्रित कौर, एमसी स्टॅन आणि शिव ठाकरे यांना भरपूर टॉर्चर केले. अर्चनाने किचनमधून हळद आणून तिघांच्या तोंडावर फेकली. यावेळी त्यांच्या डोळ्यातही थोडी हळद गेली, त्यानंतर तिघेही किंचाळू लागले होते. अर्चनाच्या या कृत्यामुळे स्टॅन आणि निम्रित यांच्या डोळ्यांत पाणी येत आहे. तर, शिव ठाकरेच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. त्याचे डोळे लाल झाले असून, सूज देखील आली आहे.

या टॉर्चर टास्कनंतर शिव आणि स्टॅन निम्रितसोबत कॅप्टन रूममध्ये आराम करण्यासाठी गेले. यावेळी शिवला पाहून स्टॅन आणि निमृत दोघांनाही वाईट वाटले. दोघांनीही अर्चना विषयीचा आपला राग व्यक्त केला. तिघांना बोलताना पाहून थोड्या वेळाने अर्चनाही शिवच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथे येते. तेव्हा, निमृत तिच्यावर चिडते आणि म्हणते की, तुझ्यामुळे ही अवस्था झाली आहे.

यावर अर्चना देखील निम्रितला जोरदार प्रत्युत्तर देत म्हणते की, तुझ्या चेहऱ्यावर जे झालंय, ते माझ्या चेहऱ्यावरही झालं आहे, प्रियांकाच्या चेहऱ्यावरही झालं आहे, त्यामुळे ही काही मोठी गोष्ट नाही.’ यावर दोघींमध्ये चांगलेच वाद सुरू होतात. यावेळी विकेंड का वार भागामध्ये करण जोहर घरात येणार असून, तो देखील अर्चनाला खडे बोल सुनावणार आहे.

पुढील बातम्या