मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aryan Khan: आर्यन खानच्या क्लोदिंग ब्रँडच्या किंमती पाहून नेटकरी चक्रावले! मीम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Aryan Khan: आर्यन खानच्या क्लोदिंग ब्रँडच्या किंमती पाहून नेटकरी चक्रावले! मीम्सचा सोशल मीडियावर धुमाकूळ

May 01, 2023, 03:36 PM IST

  • Aryan Khan Clothing Brand: आर्यन खान याने लाँच केल्या या क्लोदिंग ब्रँडच्या कपड्यांच्या किंमती पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. इतकेच नाही, तर या किंमतींवर सोशल मीडियावर आता मजेशीर मीम्सही व्हायरल होत आहेत.

Aryan Khan Clothing Brand

Aryan Khan Clothing Brand: आर्यन खान याने लाँच केल्या या क्लोदिंग ब्रँडच्या कपड्यांच्या किंमती पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. इतकेच नाही, तर या किंमतींवर सोशल मीडियावर आता मजेशीर मीम्सही व्हायरल होत आहेत.

  • Aryan Khan Clothing Brand: आर्यन खान याने लाँच केल्या या क्लोदिंग ब्रँडच्या कपड्यांच्या किंमती पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. इतकेच नाही, तर या किंमतींवर सोशल मीडियावर आता मजेशीर मीम्सही व्हायरल होत आहेत.

Aryan Khan Clothing Brand: बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याने नुकताच स्वतः क्लोदिंग ब्रँड सुरू केला आहे. त्याचा हा लग्झरी क्लोदिंग ब्रँड D'YAVOL X गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. आर्यन खानने स्वतः या ब्रँडच्या जाहिरातीचे दिग्दर्शन केले होते. तर, त्याच्या या जाहिरातीत पापा शाहरुख खान देखील दिसले आहे. शाहरुख आणि आर्यन दोघांना पहिल्यांदाच एकत्र काम करताना पाहून चाहते देखील खूश झाले होते. आता आर्यनच्या या क्लोदिंग ब्रँडची वेबसाईट रविवारीपासून लाईव्ह करण्यात आली आहे. अर्थात आता त्यांच्या वेबसाईटवरून कपडे खरेदी करता येणार आहे. मात्र, या ब्रँडच्या कपड्यांच्या किमती पाहून आता चाहते हैराण झाले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

उत्कर्ष शिंदे आणि गौतमी पाटील यांचा अल्बम पाहिलात का? सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

अभिनेत्री मलायका अरोराने वांद्रे येथील घर दिले भाडे तत्त्वावर, जाणून घ्या किती आहे भाडे?

Cinema Hall Shut Down : मोठी बातमी! आजपासून दहा दिवस चित्रपटगृहे राहणार बंद, काय आहे कारण? जाणून घ्या

मोडलेला हात घेऊन ऐश्वर्या राय बच्चनचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये जलवा, लूक चर्चेत

आर्यन खान याने लाँच केल्या या क्लोदिंग ब्रँडच्या कपड्यांच्या किंमती पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. इतकेच नाही, तर या किंमतींवर सोशल मीडियावर आता मजेशीर मीम्सही व्हायरल होत आहेत, ज्यांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आर्यन खानने सुरू केलेल्या कपड्यांच्या ब्रँडची अर्थात D'YAVOL X ची वेबसाईट लाईव्ह असताना क्रॅश झाली होती. त्याच्या ब्रँडची ही वेबसाईट सुरू होताच त्यावर नेटकऱ्यांची गर्दी जमली. लोकांचा प्रतिसाद पाहून नंतर त्यांना ट्वीट करून सांगावे लागले की, ‘आम्ही प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक आणि चेकआउट अनुभवत आहोत. त्यामुळे कृपया थोडा वेळ वाट बघा.’ यानंतर, त्यांनी पुन्हा वेबसाईट पुन्हा लाईव्ह करण्याची घोषणा केली. त्यानंतर चाहत्यांनी खरेदी सुरू केली. मात्र, कपड्यांची किंमत पाहून काही चाहत्यांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रियाही शेअर केली. कपड्यांच्या किंमतींचा तपशील ट्विटरवर शेअर करताच मीम्स व्हायरल होऊ लागले आहेत.

पुढील बातम्या