मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anant Ambani Pre-wedding: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

Anant Ambani Pre-wedding: लेकाच्या प्री-वेडिंगमध्ये नीता अंबानींचा राजेशाही थाट, नेकलेसची किंमत वाचून व्हाल थक्क

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 04, 2024, 03:14 PM IST

    • Nita Ambanis Precious Necklace: नीता अंबानी यांच्या प्रत्येक लूकची कायमच जोरदार चर्चा सुरु असते. सध्या लेकाच्या प्रीवेडिंग फंकशनमध्ये त्यांनी घातलेल्या नेकलेची चर्चा सुरु आहे.
Nita Ambanis Precious Necklace price

Nita Ambanis Precious Necklace: नीता अंबानी यांच्या प्रत्येक लूकची कायमच जोरदार चर्चा सुरु असते. सध्या लेकाच्या प्रीवेडिंग फंकशनमध्ये त्यांनी घातलेल्या नेकलेची चर्चा सुरु आहे.

    • Nita Ambanis Precious Necklace: नीता अंबानी यांच्या प्रत्येक लूकची कायमच जोरदार चर्चा सुरु असते. सध्या लेकाच्या प्रीवेडिंग फंकशनमध्ये त्यांनी घातलेल्या नेकलेची चर्चा सुरु आहे.

Anant Ambani-Radhika Merchant pre wedding: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अनंत राधिका मर्चंटशी लग्न करणार आहे. त्यापूर्वी त्यांचे प्रीवेडिंग फंकशन आयोजित करण्यात आले होते. गुजरातमधील जामनगर येथे अनंत आणि राधिकाचे प्रीवेडिंग फंकशन आयोजित करण्यात आले होते. १ ते ३ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली. दरम्यान, नीता अंबानी घातलेल्या नेकलेसची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मानधन मिळालं नाही म्हणून प्रॉडक्शन हाऊसमध्ये रोज जेवून पैसे वसूल केले! नवाजुद्दीन सिद्दीकीचा किस्सा ऐकलात?

२५ दिवसांनंतर ‘सोढी’ घरी परतला! नक्की कुठे गेला होता अभिनेता गुरुचरण सिंह?

‘बाजीराव मस्तानी’साठी संजय लीला भन्साळी यांनी अलका कुबल यांना का नाकारलं? अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा!

पुन्हा एकदा ‘सायली’ आणि ‘कला’ने मारली बाजी! पाहा या आठवड्याचा मराठी मालिकांचा TRP Report

अनंत-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सोहळ्याची सुरुवात हॉलीवूडची प्रसिद्ध गायिका रिहानाच्या गाण्याने झाली. दुसऱ्या दिवशी बॉलीवूड कलाकारांनी आपल्या डान्सने सगळ्यांना थिरकायला लावले. सोहळ्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल, ३ मार्चला ‘टस्कर ट्रेल्स’ आणि ‘हस्ताक्षर’ कार्यक्रम पार पडला. त्यानंतर रात्री भव्य महाआरती आणि अनंत-राधिका यांची हस्ताक्षर सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अंबानी कुटुंब व सगळे पाहुणे पारंपरिक लूकमध्ये दिसून आले. या सगळ्यात लक्ष वेधून घेतले ते नीता अंबानी यांनी.
वाचा: आलियाच्या कडेवरील राहाला पाहताच अनंत अंबानी झाला खूश, पाहा व्हिडीओ

नीता अंबानी यांच्या लूकची नेहमीच चर्चा रंगलेली असते. कधी त्यांच्या बॅगची, लिपस्टीकची तर कधी हेअर स्टाइलची. सध्या नीता यांनी अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगमध्ये केलेल्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले आहे. अनंत व राधिकाच्या हस्ताक्षर सेरेमनीमध्ये नीता अंबानी यांनी मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली चंदेरी रंगाची कांजीवरम साडी नेसली होती व गळ्यात हिरव्या रंगाच्या पन्ना हिऱ्याचा हार घातला होता. नीता अंबानी यांच्या गळ्यातील हारची किंमत जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
वाचा: 'अच्छा तो हम चलते हैं...', धर्मेंद्र यांच्या पोस्टमुळे चाहते चिंतेत

अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग फंकशनमध्ये जगभरातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. त्यामध्ये ‘फेसबुक’चे सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिलिसाचा देखील समावेश आहे. बॉलिवूडमधून शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, किरण राव, जितेंद्र, करीना कपूर खान, सैफ अली खान, सारा अली खान, इब्राहिम अली खान, करीश्मा कपूर, रितेश देशमुख, जिनिलिया, दीपिका पादूकोण, रणवीर सिंग, आलिया भट्ट, रणबीर कपूर, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि इतर काही कलाकारांनी हजेरी लावली.

कधी होणार लग्न?

गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.

विभाग

पुढील बातम्या