Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding: देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. १ मार्च पासून त्याच्या लग्नाच्या आधीच्या विधींना सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड, हॉलिवूड आणि राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. दरम्यान सोशल मीडियावर अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरची लेक राहाच्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे. तिच्या या क्यूट व्हिडीओवर चाहते फिदा झाले आहेत.
जामनगर याठिकाणी अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रम मोठ्या थाटात सुरु आहे. कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर दोघे लेक राहा कपूरसोबत उपस्थित आहेत. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आलिया, राहा आणि अनंत अंबानी एकत्र दिसत आहेत. व्हिडीओमध्ये आलिया लेक राहाला कडेवर घेऊन फिरताना दिसत आहे. अशात राहाला समोर पाहाताच अनंत अंबानी आनंदी होतात आणि ज्यूनियर कपूरवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. राहा मात्र, त्याच्याकडे पाहण्यासही नकार देते.
वाचा: अनंत अंबानीच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमासाठी रिहानाने किती पैसे घेतले? मानधन वाचून बसेल धक्का
सध्या सोशल मीडियावर आलिया, राहा आणि अनंतचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. एका यूजरने ‘बॉलिवूडते सर्व सेलिब्रिटी एकीकडे तर, राहा एकीकडे..’ अशी कमेंट केली आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘आई आणि लेक दोघी प्रचंड क्यूट दिसत आहेत’ असे म्हटले आहे. तिसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘कोणीची नजर नको लागायला…’ सगळ्या स्टारकिड्समध्ये राहा सर्वांचे लक्ष वेधून घेत असल्याचे सिद्ध होत आहे.
व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केवळ राहा आणि आलियाचे नाही तर अनंत अंबानीचे देखील कौतुक केले आहे. एका यूजरने ‘अनंत किती प्रेमळ आहे…’ असे म्हटले आहे. दुसऱ्या एका यूजरने ‘अनंत अंबानीचे स्पीच ऐकून चांगले वाटले…’ अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची लेक राहाचा जन्म ६ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. आलियाने सोशल मीडियावर फोटो शेअर करत प्रेग्नंट असल्याची माहिती दिली होती. इतके दिवस आलियाने राहाचा चेहरा फोटोग्राफर्सपासून लपवला होता. डिसेंबर महिन्यात रणबीरने सर्वांसमोर राहाला आणले. तिचा फोटो पाहून अनेकांना दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांची आठवण आली. आता अनंत अंबानीच्या प्रीवेडींग फंकशनमधील फोटो पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
गेल्या वर्षी १९ जानेवारी रोजी राधिका आणि अनंत यांचा साखरपुडा पार पडला. त्यांच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु होती. आता १-३ मार्च रोजी लग्नापूर्वीचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर १२ जुलै रोजी त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे. मुंबईत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे.